मुलीला कधीच देऊ नका ही 1 वस्तू; नाहीतर विनाश होईल, पहा काय आहे ती वस्तू.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असे म्हणतात मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली. मुलीला आपण देवी लक्ष्मी चे स्वरूप मानतो. मुली मध्ये देवी दुर्गा ,देवी महालक्ष्मी व देवी सरस्वती चे रूप पाहायला मिळते. मुलगी प्रत्येक आई-वडिलांची खूप लाडकी असते तिला राजकन्ये सारखे वाढविले जाते परंतु मनामध्ये नेहमी हि भावना असते की मुलगी हे परक्याचे धन आहे. काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून मुलगी वयात आली की आई वडील आपल्या लाडक्या परीचे विवाह करून देतात.
आपली जबाबदारी पूर्ण करतात. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते म्हणूनच आई वडील आपल्या मुलीला काय हवे आहे याची दखल घेत असतात त्याचबरोबर आपल्या मुलीची सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात. सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये घाई गडबड पाहता-पाहता आई-वडिलांची दमछाक होते. आपल्या मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणे असे नसते तर आपल्या मुलीच्या बद्दल एक प्रेम व्यक्त होण्याचा सोहळा सुद्धा असतो.
आज कालची विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूपच वेगळे आहे. आज कालच्या लग्नामध्ये मोठी बँड बाजा सजावट मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या जातात परंतु जरी लग्न पद्धती बदलली असली तरी त्यामागील प्रेम मात्र तेच आहे. आज कालच्या लग्नामध्ये जरी रूढी परंपरा पाळल्या गेल्या नसल्या तरी आपल्या आवडीनिवडी हौस मात्र पूर्णपणे भागवली जाते. त्यापैकी सर्वात मोठी हौस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणे. या भेट वस्तू पैकी एक अशी विशेष भेटवस्तू असते जी मुलीला लग्नामध्ये अवश्य दिली जाते.
अनेक जण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती व फोटो भेट म्हणून अवश्य देतात. हिंदू धर्म शास्त्रामध्ये गणपतीबाप्पाला विघ्नहर्ता मानले जाते आणि जेथे गणपती बाप्पाची मूर्ती असते तेथे कोणत्याच प्रकारचे विघ्न येत नाही त्याचबरोबर गणपतीबाप्पांना शुभमंगल याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच आई-वडील आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती अवश्य देतात पण तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती देण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला. चला तर मग जाणून घेऊया असे का.? त्यामागे नेमके काय कारण आहे.?
शास्त्रानुसार मुली या माता लक्ष्मीचे रूप मानले जातात म्हणून गणपती व देवी लक्ष्मी एकत्र असणे हे धनाचे आगमनाचे संकेत असते. अशातच घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट दिली तर तिच्यामागे घरात खूप मोठी धन हानी होऊ शकते. ती जाताना घरातील सर्व सुख-समृद्धी घेऊन जाते. कधी गणपती बाप्पा फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देऊ नये.
जसं आपण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती दिलेला आहे त्यानंतर आपल्याला अनेक आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागत असेल तर अशावेळी काय करावे ? अशा वेळी आपल्या मुलीला सांगावे कि भेट म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ही नव्याने आपल्याला द्यावे कारण घराच्या मुलीने आपल्याला बाप्पा ची भेट दिली तर ते शुभ मानले जाते आणि यामुळे आपले घर नेहमी भरलेले राहते तसेच देवी लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात कायमचे वास्तव्य करेल. आता लक्षात आले तसेच गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती मुलीला लग्नात का देऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.