काहीही होऊ द्या पण घरातील या 5 वस्तू कधीच कोणालाही देऊ नका, नाहीतर लक्ष्मी रुसेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टी च्या सहाय्याने मनुष्य आपली प्रगती करू शकतो. मनुष्याची प्रगती आपल्या हातामध्ये असते. मनुष्याची कर्म ठरवतो की भविष्यात त्याला यश मिळायला पाहिजे की अपयश. बहुतेक वेळा आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक वस्तू एकमेकांना उधार देत असतो किंवा काही वस्तू उधार घेत असतो याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती नसते आणि याच गोष्टी आपल्या अधोगतीला कारणीभूत देखील ठरतात.
बहुतेक वेळा आपल्याला एखादी अडचणी व समस्या निर्माण झाली तर आपण इतरांना काही वस्तू देतो व इतरांकडून काही वस्तू घेत असतो, अशावेळी आपल्याला त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते व आपल्या नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापर्यंत सुद्धा जात असते.अनेकदा सकारात्मक ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचते व त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते म्हणूनच अशा काही वस्तूंची देवाणघेवाण करते वेळी आपल्याला काळजी देखील करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या वस्तू बद्दल जाणून घेणार आहोत,ज्या वस्तू आपल्याला चुकून सुद्धा द्यायच्या नाहीत किंवा स्वीकारायच्या नाहीत त्याबद्दल..
यातील पहिली वस्तू म्हणजे पेन. आपल्यापैकी अनेक जण चेकबुक व महत्त्वाचे कागदपत्रांवर सही करण्यासाठी पेनचा वापर करत असतात. अनेकदा पेन आपले भाग्य ठरवत असते. जेव्हा आपण बँकेमध्ये काही कामानिमित्त जातो तेव्हा एखाद्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी आपल्याला पेनची आवश्यकता असते परंतु जर आपल्याकडे पेन नसेल तर आपण इतरांकडून पेन मागून सही करतो. अशा वेळी त्या व्यक्तीकडून काही काळासाठी पेन घेतलेला असेल त्या द्वारे आपण काम करून घेतो परंतु जर ती व्यक्ती त्याचा पेन न घेताच निघून गेला तर अशावेळी तो पेन आपल्याकडे जास्त वेळ ठेवू नये.
बँकेच्या बाहेर एखादे पिंपळाचे झाड असेल तर त्या ठिकाणी पेन ठेवून द्यावा. आपण आपला वापरलेला पेनसुद्धा इतरांना अजिबात देऊ नये. जर तुम्हाला कुणाला पेम द्यायचाच असेल तर नवीन पेन विकत घेऊन द्या परंतु वापरलेला पेन शक्यतो कोणाला देऊ नका. दुसरी वस्तू म्हणजे आपला हात रुमाल.आपला हात रुमाल शक्यतो इतरांना अजिबात देऊ नका.
असे केल्याने आपली ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीकडे जाते व दुसऱ्या व्यक्तीचा हात रुमाल सुद्धा वापरू नये त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की, इतरांच्या वापरलेल्या अंतर्वस्त्र गारमेंट्स चुकूनही स्वतः वापरू नका त्यामुळे बहुतेक वेळा आपल्याला रोग होण्याची शक्यता असते आणि रोगराई म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते आणि आपल्याला अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. आपल्यापैकी अनेक जण हातामध्ये घड्याळ घालत असतात. जेव्हा आपण एखादी महत्त्वाचे काम करत असताना बाहेर जातो तेव्हा हातामध्ये घड्याळ घालत असतो किंवा एखादी वाईट वेळ आलेली असते तेव्हा सुद्धा पण घड्याळाकडे पाहत असतो.
याचा अर्थ आपल्या चांगल्या व वाईट काळाचा साक्षीदार हे घड्याळ असते. घड्याळा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा असते आणि जेव्हा आपण ती हातामध्ये घालतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा सुद्धा घड्याळा मध्ये समाविष्ट होत असते,अशावेळी जर तुम्ही तुमचे घड्याळ इतरांना द्याल तर तुमचे भाग्य इतरांच्या वाटेला जाते आणि त्याचे तुम्हाला त्यांचे दुःख सुद्धा मिळण्याची शक्यता असते.
जर तुमचे जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतील तर अशा वेळी तुम्ही इतरांना तुमचे घड्याळ दिले तर तुमचे भाग्य त्या व्यक्तीला प्राप्त होण्याची शक्यता असते आणि भविष्यात तुम्हाला अनेक अडीअडचणी व दारिद्र्य सामोरे जावे लागू शकते. अनेकदा आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला असणारे व्यक्ती एकमेकांचे कपडे शेअर करत असतात अशा प्रकारची कृती करणे अत्यंत वाईट आहे.
जेव्हा आपण आपले कपडे एकमेकांना देतो किंवा त्यांचे कपडे घालतो तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अनेकदा आपण इतरांचे कपडे घालतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला एखादा आजार असेल किंवा त्वचा विकार असेल तर तो त्वचाविकार तुम्हाला सुद्धा होऊ शकतो म्हणूनच अशा वेळी इतरांची कपडे वापरताना आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे, यामुळे तुमच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.