झोपण्यापूर्वी चुकूनही करू नका या गोष्टीचे सेवन., होऊ शकतात गंभीर परिणाम..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो झोपण्याच्या आधी चुकूनही करू नका या गोष्टींचं सेवन नाहीतर तुमची झोप उडून जाईल. लोकं नेहमी ग्रीन टी पिण्याचे फायदे बघत असतात पण तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या वेळी ग्रीन टी पिल्याने नुकसान देखील होऊ शकते.
ग्रीन टी मध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सूज कमी करण्याचे आणि त्याचबरोबर खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे तसेच हृदय विकार कमी करण्याचे काम करतात. लोकं नेहमी स्वतःला फिट ठेवण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी कोणत्याही वेळी ग्रीन टी चे सेवन करणे आपल्या आरोग्याला हानी पोहचवू शकते.
रात्री ग्रीन टी पिल्याने तुमची झोप प्रभावित होऊ शकते. ज्यामुळे तुमचा दुसरा दिवस पूर्णपणे खराब होऊ शकतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीन टी पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती आहे.
medicalnewstoday.com
ग्रीन टी पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वात उत्तम असते. ग्रीन टी मध्ये असलेले थिनीन, कोर्टोसोल सारखे तणावासंबंधी हार्मोनल ला कमी करण्याचे काम करतात. हे शरीरामध्ये पोहोचून मेंदूतील न्यूरॉन च्या गतिविधीला आराम देते. ग्रीन टी मध्ये कॉफी च्या तुलनेत कॅफिन ची मात्रा कमी असते.
नुकत्याच झालेल्या एका रिसर्च नुसार असे समोर आले आहे कि सकाळच्या वेळी ग्री टी पिल्याने माणसाला रात्री चांगली झोप येते. अशामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी सकाळी किंवा दुपारी १-२ कप ग्रीन टी जरूर प्यावी.
तर रात्री झोपण्यापूर्वी २ तास अगोदर ग्रीन टी पिण्यापासून दूर राहिले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि आवडल्यास शेअर करायला देखील विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.