फक्त ५ सोमवार करा हे व्रत; मनातील कोणतीही ईच्छा ताबडतोब होईल पूर्ण.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्यांमध्ये पाच सोमवारी पूर्ण श्रद्धेने ,निष्ठेने मनोभावे भक्ती भावे ने करतो भोले बाबा त्या व्यक्तीच्या इच्छा नक्की पूर्ण करतात. तुमच्या मनामध्ये कोणतेही इच्छा असू द्या .अनेक दिवसांपासून ,अनेक वर्षांपासून खूप वर्षापासून अपूर्ण आहे त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी कोणत्याही सोमवारी पशुपती व्रत अवश्य करा.
शिवमहापुरण अनेक विषयांचे नियम सांगितले आहेत. साधकाने कोणकोणत्या नियमाचं पालन करावं. कोणत्या वस्तूचे दान करावें ,अगदी स्पष्टपणे सर्विस तर माहिती सांगितली आहे. त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये सर्वांना नियमाचे पालन करणे शक्य होत नाही आणि म्हणून अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये शास्त्र संबंध मान्य होईल अशाप्रकारे हे पशुपती व्रत कस करावं हे माहिती करून घेणार आहोत. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करून घेणार आहोत.
कोणत्याही सुखाची प्राप्ती करायची असेल जगातील कोणतेही सुख तुम्हाला उपभोगायचं असेल तर त्यासाठीसुद्धा पशुपती व्रत केलं जातं त्याचप्रमाणे असं कोणतंही काम नाही की पशुपती व्रत केल्यानंतर काम अपूर्ण राहील किंवा त्यामध्ये यश मिळणार नाही. त्याचप्रमाणे हे व्रत करताना काही नियमांचं पालन करावं लागतं आणि तेच अत्यंत मूलभूत नियम याठिकाणी करायचे आहे.
हे व्रत करण्याची विधी अशी आहे की, हे व्रत करताना सलग पाच सोमवार किंवा मध्ये काही प्रॉब्लेम्स आले मासिक पाळी चा प्रॉब्लेम अनेक काही प्रॉब्लेम आले तर तो सोमवार सोडून पुढचा सोमवार सुद्धा घेऊ शकतात सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा ज्यांना शक्य असे ब्रह्म मुहूर्तावर उठावे. स्वच्छ स्नान करा . सूर्य देवास जल अर्पण करणे म्हणजे हातात तांब्या घेऊन त्यामध्ये जल दोन्ही हात उंच करून सूर्याकडे पाहून जल अर्पण करणे.
ओम सूर्याय नमः म्हणत आणि त्यानंतर आपण बोले बाबाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जायचे आहे. शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे.जाताना आपण शिवलिंगास ज्या वस्तू घेऊन जातो त्या त्या वस्तू घेऊन जायचे आहे. तांब्या भरून जल आपल्या घरातूनच घेऊन जा. मंदिरातले पाणी वापरू नका. आपल्या घरातल्या जलाने आपल्या भोले बाबांचा अभिषेक करायचा आहे. भोले बाबा ची पूजा करायची आहे.
पूजेमध्ये बेलपत्र अत्यावशक मानला जातो .बेलपत्र अवश्य न्या. बेलपत्र पालथी घालावीत आणि ती वाहावित अशाप्रकारे भोले बाबा ची पूजा करा. आराधना करा .ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करा. महिलांनी फक्त नमः शिवाय नमः शिवाय हा जप करायचा आहे. आपण पूजा करू शकता किंवा अभिषेक सुद्धा घालू शकतात .ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्या त्या गोष्टी सर्व करा. त्यानंतर पूर्ण दिवसभर आपण उपवास करायचा आहे.
फल आहार फक्त आपण करणार आहोत. सायंकाळी जेव्हा सूर्य मावळू लागेल त्या प्रदोषकाळी पुन्हा एकदा आपण बोले बाबांच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे परंतु या वेळी जाताना आपण तुपाचे ६ दिवे घेऊन जायचे आहेत. ते प्रज्वलित करायचे नाही ,पेटवायचे नाही .ते दिवे मंदिरात घेऊन जायचे आहेत आणि थोडं गोडधोड साखर किंवा मिठाई असेल ते घेऊन जायचे आहे आणि पुन्हा एकदा शिवलिंगाची बोले बाबा ची मनोभावे पुजा करायची आहे आणि मंत्राचा जप करा आणि पाच दिवे शिवलिंग जवळ प्रज्वलित करा आणि आपण जे गोड घेऊन गेलेले आहेत त्याचे तीन भाग करा.
त्या प्रसादाचे दोन भाग आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत आणि उरलेला जो एक भाग आहे व एक दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे. त्यानंतर घरी येताना आपल्या घराचा उंबरठा आहे तेथे आपल्याला हा दिवा उजव्या हाताला म्हणजेच उंबरठ्याच्या उजव्या बाजूला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे.घरात प्रवेश केल्यानंतर तो प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी खायचा आहे व त्यानंतर भोजन करायचे आहे अश्या प्रकारे जर तुम्ही वर्षभरातील कोणतेही पाच सोमवार उपवास केल्यास तुम्हाला भोलेबाबा योग्य ते फळ देतील आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.