या आयुर्वेदिक चूर्णाने दात घासा; दात दुखी, दाढ दुखी, हिरड्या सुजणे होईल कायमचे बंद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चूर्णाचा वापर करा आणि आपले दात वज्रा सारखी मजबूत बनवा. या चूर्णाचा वापर केल्याने भविष्यामध्ये तुमचं दात कधीच दुखणार नाही. हा उपाय केल्याने तुमच्या दाताचा ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होणार आहेत. बहुतेक वेळा सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की अनेकांना दात दुखी ची समस्या भेडसावत असते त्यामध्ये दात किडणे ,दात दुखणे, दातामध्ये पू असणे, दातातून रक्त येणे ,हिरड्या सुजणे अशा असंख्य समस्या आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणूनच हा उपाय केल्याने आपल्या दातांशी संबंधित अनेक समस्या लवकरच दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत आणि हे दोन्ही पदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि हे दोन्ही पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रातील महत्त्वाचे पदार्थ असल्यामुळे त्यांचा कोणताच दुष्परिणाम आपल्याला नाही म्हणून हा उपाय आपल्याला आवश्यक करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल महत्त्वाची अशी माहिती.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जाडे मीठ घ्यायची आहे, यालाच आपण समुद्री मीठ सुद्धा म्हणतो. आपण नेहमी वापरणारे जी मीठ असते ते मीठ या उपायासाठी वापरायचे नाही कारण की त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण भरपूर असते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी जाड मीठ वापरायचा आहे आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे जटा वंशी.
हा एक आयुर्वेदिक पदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होत असतो. आपल्याला एका खलबत्त्यामध्ये जाडे मीठ व जटा वंशी दोघे एकत्र करून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे.
ही पावडर आपण दिवसभरातून दोन वेळा तरी आपल्या दातांना लावली तरी आपल्या दातांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. हा उपाय केल्याने आपले दात दुखणे ,दातातून रक्त येणे ,हिरड्या सुजणे ,जिभेवर जर पिवळा थर साचला असेल तोसुद्धा हा उपाय केल्याने दूर होतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा आणि आपले दात चांगले आणि मजबूत बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.