फक्त १ सुपारी या ठिकाणी गुपचूप ठेवा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुपारी मध्ये श्रीगणेश यांचा वास असतो. जेव्हा एखादे शुभकार्य असते, लग्न कार्य असेल , सत्यनारायण पूजा, होम हवन कोणत्याही प्रकारची पूजा असेल त्या ठिकाणी गणपतीचे स्वरूप म्हणून सुपारी ठेवली जाते व या सुपारीचे ही पूजन केले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत की सुपारीच्या मदतीने आपण आपल्या सर्व इच्छा कश्या पूर्ण करू शकतो.ही पूजा तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकते.
तुम्हाला या सुपारीचा उपाय सलग सात दिवस करायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. फक्त सकारात्मक विचार मनात ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचे आहे .हा उपाय अगदी साधा सोपा आहे यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी वापरायची आहे. आपण खाण्यासाठी जी सुपारी वापरत असतो व पूजेसाठी ची सुपारी हे दोन्ही सुपारी वेगळे असतात. पूजेसाठी वापरली जाते ती सुपारी आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे.
ही सुपारी पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल. यासाठी नवी कोरी सुपारी आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच आधी पूजेमध्ये वापरलेली सुपारी वापरायची नाही. हा उपाय करण्यासाठी नवीन सुपारी घरात आणून ठेवू शकता परंतु हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे तर आपण सुपारी एक दिवस म्हणजे बुधवारी आणू शकतो. गुरूवारच्या दिवशी आपल्याला या सुपारीला दुधाने व नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे.सुपारी आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे.
गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता.सुपारीची पुढे सात दिवस हळद कुंकू उदबत्ती दाखवून पूजा करायचे आहे. ही सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेश आहेत अशी भावना ठेवून मनोभावे या सुपारीची पूजा करायची आहे.सात दिवस पूजा केल्यानंतर आठव्या दिवशीही सुपारी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे.
दुकानातील गल्ला मध्ये तुम्ही ही सुपारी ठेवू शकता. आपण कितीही कष्ट केले, मेहनत केली तरी जोपर्यंत नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कार्यात यश मिळत नाही परंतु हा उपाय केल्यानंतर नशिबाची साथ तुम्हाला मिळू लागेल. ही सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेश आहेत आणि जिथे श्री गणेशाचे वास्तव्य तेथे प्रत्येक कार्यात यश मिळते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.