४४ वयामध्ये मध्ये तुम्हाला २५ चे दिसायचे असेल तर आजपासूनच गूळ खायला चालू करा.!

४४ वयामध्ये मध्ये तुम्हाला २५ चे दिसायचे असेल तर आजपासूनच गूळ खायला चालू करा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना गूळ आवडत असेल. आपल्याकडे गूळ हा आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभदायक मानला जातो. तसेच या गुळात काही औषधी गुण आहेत ज्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. तर गुळाचे असेच काही चमत्कारिक गुण आज आपण पाहणार आहोत.

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यावर गूळ हे अतिशय चांगलं औषध आहे. एक ग्लास दुधासोबत गूळ घेतल्यास हाडे मजबूत होतात. तसेच आल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. त्वचा संबंधी रोग असलेल्या लोकांसाठी गूळ खूप लाभदायक असतो. गूळ शरीरातील नुकसानकारक केमिकल्स बाहेर काढण्याचं काम करतो. तसेच चेहऱ्यावरचं पिंपल्स कमी करण्याचं काम देखील हा गूळ करतो.

पोटाच्या संबंधीच्या अनेक आजरात गुल खूप फायद्याचा ठरतो. गूळ खाल्ल्यामुळे आपले पाचनतंत्र्य सुधारते. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भवती स्त्रियांना देखील गूळ खाण्याचा सल्ला देतात. तसेच सर्दी असलेल्या लोकांसाठी सुद्धा गूळ खाणे खूप फायद्याचे असते. त्यामुळेच हिवाळ्यात लोकं गूळ खातात. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो.

गुळाचा वजन कमी करण्यास देखील खूप फायदा होतो. यासाठी रोज गुळाचा चहा घ्यावा. याने वजन कमी होण्यास मदत होते. गूळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. शारीरिक अशक्तपणा आल्यास गूळ खाल्यामुळे जास्त फायदा होतो. शरीरातील धातूंची झीज भरून काढण्याचं काम सुद्धा गूळ करतो.

थंडीत गूळ खाण जास्त फायदेशीर ठरतं परंतु अतिप्रमाणात खाऊ नये. कारण गुळामध्ये उष्णता जास्त असते. रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स ची समस्या दूर होते. जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. तसेच घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खाल्ल्याने आराम मिळतो.

पण गुळाच्या अति खाण्यामुळे रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याचा धोका असतो. म्हणून ज्यांना त्वचेचे जास्त रोग आहेत त्यांनी शक्यतो जास्तीत जास्त गुळाचा वापर टाळावा. ज्यांची त्वचा अत्यंत संसर्गजन्य आहे, ज्यांना ऍलर्जी आहे यांनी गुळाचे सेवन करू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *