फक्त एकदा करा हा उपाय अन कफ, खोकला, सर्दी, ताप कायमचा घालवा या रामबाण उपायाने.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बदलते हवामान, इन्फेक्शन आणि वाढता संसर्ग यामुळे घसा दुखणे तसेच सर्दी ,ताप ,खोकला या समस्या जास्त प्रमाणात वाढत आहेत. बऱ्याच वेळा या समस्या साधारण नसतात परंतु यांवर वेळीच इलाज केल्यास वाढणाऱ्या धोक्या पासून आपला बचाव होऊ शकतो म्हणूनच आपल्या घरातील काही पदार्थांचा वापर केल्यास या व्हायरल इन्फेक्शन पासून आपण आपला बचाव घरबसल्या करू शकतो पण हा संसर्ग प्रमाण जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे.
अगदी घरबसल्या सर्दी, ताप, खोकला ,घसा दुखणे, घशातील इन्फेक्शन किंवा छातीत कफ असेल किंवा जुनाट एखादा आजार या सारख्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय आज आपण करणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया एक महत्वाचा उपाय..
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत लवंग आणि काळी मिरे. सर्वप्रथम लवंग आणि मिरे आपल्याला तव्यावर किंवा कढईत मध्ये अगदी हलक्या हाताने थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि त्याची बारीकशी पावडर आपल्या या ठिकाणी बनवून घ्यायची आहे. ही पावडर साधारणपणे आपल्याला एका मोठ्या व्यक्तीसाठी बनवायचे असेल तर एक चमचा पावडर घ्यावी. जर तुम्ही लहान मुलांसाठी हे प्रमाण बनवत असाल तर फक्त एक चिमूट काळीमिरी आणि लवंग पावडर आपल्याला घ्यायची आहे.
काळी मिरी यामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म जास्त प्रमाणात असून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते त्याचरोबर थकवा, डोकेदुखी नाहीशी करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. हा उपाय करण्यासाठी जो दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद.हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत गुणकारी असून घशातील इन्फेक्शन दूर करून घशाला आलेली सूज देखील नाहीशी करण्यासाठी या हळदीचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो तसेच व्हायरल इन्फेक्शन पासून आपला बचाव होण्यासाठी देखील हळद अत्यंत गुणकारी आहे, अशी ही महत्वाची हळद आपल्याला घ्यायची आहे.
या सोबतच तिसरा घटक आहे तो म्हणजे काळे मीठ .काळे मीठ हे घशातील खवखव,आलेली सूज दूर करण्यासाठी उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो, असे हे काळे मीठ चिमूटभर आपल्या या ठिकाणी वापरायचे आहे ,आता चौथा घटक आहे तो म्हणजे मध. मध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याच बरोबर मधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्त्वे उपलब्ध असतात. विटामीन ए, विटामीन बी ,व्हिटॅमिन सी यासारखी महत्त्वाचे विटामिन उपलब्ध असतात.
शरीरामध्ये शक्ती स्फूर्ती निर्माण करून रोगाशी लढा देण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि दम्यासाठी देखील मध गुणकारी असून आल्या सोबत घेतल्यास खोकल्यासंबधित अनेक रोग चांगल्या प्रकारे बरे होतात.यासोबतच सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आले.
आले देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम केल्यानंतर हे आले याचा रस या ठिकाणी काढून घेणार आहोत पण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आल्याचा फक्त रस आपल्याला या उपायांमध्ये घ्यायचा आहे अशा प्रकारे आल्याचा साधारणपणे एक चमचा रस आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.
आले हे उष्ण असून खोकला, दमा, छातीत जमा झालेला कफ असेल, घशातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. हे मिश्रण आपले या ठिकाणी तयार झालेले आहे, असे हे तयार मिश्रण कमीत कमी तीन दिवस नियमितपणे सकाळी उपाशीपोटी आपल्याला प्यायचे आहे आणि प्यायल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही कोमट पाणी एक ग्लास पिऊ शकता त्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये. अशा प्रकारे नियमितपणे तीन दिवस उपाशी पोटी हा उपाय करा आणि सर्दी ताप खोकला घसा दुखणे घसातील इन्फेक्शन,व्हायरल इन्फेक्शन ,डोकेदुखी या समस्या पूर्णपणे दूर होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.