फक्त एक महिना सकाळी उपाशीपोटी हि पाने खाऊन पहा; सगळ्या समस्या होतील मुळापासून नष्ट.!

फक्त एक महिना सकाळी उपाशीपोटी हि पाने खाऊन पहा; सगळ्या समस्या होतील मुळापासून नष्ट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही अनेक औषधी वनस्पती असतात ज्यांचा आपल्या शरीराला खूप सारा फायदा असतो. अनेकदा आपण या वनस्पतींचा वापर करतो आणि आपले जीवन समृद्ध बनत असता परंतु काहीजण आपले जीवन समृद्ध बनवत नाही कारण की आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपण या वनस्पतींचा वापर करत नाही. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका महत्त्वाच्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत.

ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सर्व उपायांसाठी रामबाण औषध मानले गेलेले आहे फक्त या वनस्पतीच्या वापराने आपल्या जीवनातील अनेक समस्या लवकरच नष्ट करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया ही नेमकी वनस्पती कोणती आहे आणि या वनस्पतीचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..

आपण आजच्या लेखामध्ये ज्या आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत, त्या वनस्पतीचे नाव आहे कडुलिंब. कडुलिंबाला आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. या वनस्पतीचे पान, फळ, फूल, साल, मूळ, खोड हे सर्वच पदार्थ अत्यंत उपयोगी आहे आणि म्हणूनच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पंचांग उपयोगी वनस्पती असे मानण्यात आलेले आहेत.

तसेच या प्रकारच्या वनस्पती मध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत आणि म्हणूनच जर आपण ही पाणी नियमितपणे सेवन केल्यास आपल्या शरीरामध्ये जे काही वाईट घटक निर्माण झालेले असतात ते घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते तसेच अनेकदा आपण पाहतो की या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असे परंतु शहरांमध्ये आता अनेक ठिकाणी या वनस्पतीची लागवड केली जाते या वनस्पतीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच आपल्याला कोणत्याही प्रकारची श्वसन विकार सुद्धा होत नाहीत.

या वनस्पतीच्या अंगी अँटी बॅक्टेरियल व गुणधर्म मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल खाज, खरूज, नायटा, गजकरण या सर्व विकारांवर कडू लिंबाचे पान अत्यंत उपयुक्त ठरते. जर आपण सकाळी उठल्यावर कडुलिंबाची दोन पाने नियमितपणे खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर काळे डाग,वांग, पिंपल्स आले असतील तर ते पूर्णपणे निघून जातील तसेच यामुळे आपल्याला नेहमी फ्रेश सुद्धा वाटेल परंतु ही दोन्ही पान खाताना आपल्याला हलकी,कोवळी असणारी पाने खायचे आहेत.

जास्त जुनी पाने खायचे नाहीत आणि आपण सकाळी उपाशीपोटी खाल्ली तर आपल्याला केसांच्या संदर्भातील काही समस्या असेल, केस आपले गळत असतील, वारंवार तूटत असतील, अकाली केसांना पांढरे पण आले असतील तर ही समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाते तसेच आपल्याला पोटा संदर्भातील काही समस्या असेल तर अनेकांना वेळेवर पोट साफ होत नाही, पोटामध्ये नेहमी दुखत असते, काही केल्या साफ होत नाही, पोटा मध्ये गॅस होणे या सगळ्या समस्या सुद्धा लवकरच दूर होऊन जातात.

कडुलिंबाची पाने चवीला कडू असले तरी या पानाचे औषधी गुणधर्म एवढे प्रचंड आहेत की कोणत्याही आजारावर हमखास फरक जाणवतो. लहान मुलांना पोट दुखी झाली असेल पोटामध्ये जंत निर्माण झाले असतील तर अशा वेळी त्यांना कडूलिंबाच्या पानाचा रस दोन ते तीन थेंब अवश्‍य सेवन करायला द्या यामुळे त्यांच्या पोटातील कृमी जंत नष्ट होऊन जातील.

आपण अनेकदा जाहिराती पाहत असतो, कडुलिंबाच्या माध्यमातून बनवलेले अनेक उत्पादने आपण पाहत असतो म्हणूनच असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे कडूलिंबाचा वापर केला जात नाही तर आपल्याला चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स झाले असतील तर अशा वेळी आपण घरच्या घरीसुद्धा कडूनिंबाच्या पानांच्या फेस मास्क बनवू शकतो त्यासाठी आपल्याला कडुलिंबाची काही पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खलबत्त्या च्या सहाय्याने त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे बारीक पेस्ट बनवून झाल्यानंतर आपल्याला गाळणी च्या सहाय्याने किंवा सुती कापडाच्या साह्याने त्यातील रस काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे मुलतानी माती टाकायची आहे.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे महत्त्व सांगण्यात आलेले आहेत आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स ,काळे डाग वांग आले आहेत अशा ठिकाणी आपल्याला लावायचे आहे. हे मास्क लावल्यानंतर अर्धा ते दोन तास तसेच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ धूवायचा आहे असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊ लागेल आणि तुमचा चेहरा नेहमी टवटवीत दिसेल.

तसेच आपल्याला महिनाभर सकाळी उपाशीपोटी दोन पाने कडुलिंबाचे फायदे आहेत असे केल्याने तुमच्या शरीरामध्ये जी काही विषारी घटक आहेत ते बाहेर पडण्यास मदत होईल त्याचबरोबर तुमच्या रक्ता मध्ये जर कोणत्याही प्रकारे दूषित घटक मिसळले असतील तर ते सुद्धा कडुलिंबाच्या माध्यमातून नष्ट होऊन जाईल आणि तुमचा र”क्ताभिसरणाची प्रक्रिया व्यवस्थित होईल म्हणून आपल्याला हा उपाय आवश्यक करायचा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *