श्रावण महिन्यात शिवपिंडीवर करा हा अभिषेक.. लवकरचं सगळी संकटे गायब होतील..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिना हिंदू धर्मातील असा एक पवित्र महिना आहे, देवांचे देव महादेव यांचा खूप पवित्र महिना मानला जातो. अनेक भक्तजन सोमवारी उपवास करतात, महिनाभर ते नॉनव्हेज सुद्धा खात नाहीत कारण या महिन्याची महिमाच खूप आघात आहे. तुमच्यावर जर संकटे येत असतील, भले ते मानसिक,आर्थिक असोत आणि त्यांपासून तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा योग तुम्हाला शोधून सापडणार नाही.

या महिन्यात महादेव भक्तांवर अतिशय प्रसन्न असतात. म्हणून सर्व भक्तजन या महिन्यातउपवास, अभिषेक वगैरे करत असतात. तर मित्रांनो आपली सर्व संकटे हरण्यासाठी, आर्थिक तंगी दूर करण्यासाठी काही अभिषेक तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. ते जर अभिषेक तुम्ही तुमच्या घरी केलेत किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन जर महादेवाच्या पिंडीवर केलेत तर नक्कीच तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त व्हाल.

तुम्हाला जर आर्थिक संकट आणि त्याचबरोबर बाहेरच्या वाईट शक्ती जर तुमचं वाईट करण्याच्या मनस्थितीत असतील तर तुम्ही रुद्राअभिषेक महादेवांना तुम्ही नक्की घाला. रुद्राअभिषेक सत्यनारायणासारखीच एक पूजा असते. हा अभिषेक जर तुम्ही घातला तर तुमची सर्व प्रकारची संकटे दूर होतील. आणि तुम्हाला जो काही त्रास होत आहे तो त्रास नक्कीच कमी होईल.

या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेकाचं अनन्य असं महत्व आहे. श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच रुद्राअभिषेक घाला. त्याचबरोबर घरातील ज्या सुवासिनी आहेत त्यांनी महादेवांना काही बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि संकटहार स्तोत्र त्याचबरोबर रामरक्षास्तोत्र, शिवलीलामृत यापैकी कोणताही एक पाठ पठण केलंत तर नक्कीच तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

आम्हाला आशा आहे हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *