हि वस्तू जर कोणी देत असेल तर चुकूनही नाही म्हणू नका; अन्यथा करावा लागेल पाश्चताप.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्तीला जीवनामध्ये अनेक संधी मिळत मिळत असतात. व्यक्तीच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्याआधी काही महत्त्वाचे संकेत सुद्धा मिळत असतात परंतु काही वेळा व्यक्ती त्या संधीला नाही म्हणतात किंवा आपल्या वाईट सवयी मुळे त्या गोष्टीला नाही म्हणतो यामुळे आपल्या दारावर आलेली चांगली संधी आपण गमावतो. मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मिळत असते. मिळालेले फळ प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. मागच्या जन्मी जरी त्याला मोठा खजाना प्राप्त झाला असेल तर तो कार्य चांगले करण्यासाठी पुरुषार्थ करावाच लागतो.
अनेकदा आपण न म्हटल्यामुळे कर्मा फळाला मुकतो. आजच्या लेखामध्ये असेच काही आपण शुभसंकेत जाणून घेणार आहोत. जर असेल शुभसंकेत तुम्हाला भविष्यामध्ये मिळत असतील आणि कोणी तुम्हाला या वस्तू देत असतील तर चुकूनही नाही म्हणू नका. अनेकदा आपण वस्तूची बाहेरून पाहून त्या वस्तूला नकार देत असतो त्यानंतर आपल्याला त्याचे महत्त्व कळल्यानंतर पस्तावा होतो. अनेकदा व्यक्ती ध्येयाच्या जवळ जवळ येऊन सुद्धा हार मानते आणि यशाला पासून दूर होते . चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ज्या देताना आणि घेताना नाही म्हणू नये.
त्यातील पहिली वस्तू म्हणजे देवाचा प्रसाद. आपण अनेकदा काही काम करण्यासाठी बाहेर जात असतो पण अचानक वाटेमध्ये असे एक ठिकाण व देऊळ लागते जिथे आपल्याला दर्शन घेण्याचा व प्रसाद ग्रहण करण्याचा योग येत असतो अशा वेळी जर तुम्हाला कोणी प्रसाद दिला तर त्याला नाही म्हणू नये कारण की हा प्रसाद तुमचे भाग्य सुद्धा बदलू शकतो कदाचित देवाचीच इच्छा असेल की हा प्रसाद तुम्ही ग्रहण करावा म्हणूनच त्याने तुम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित केले असावे.
त्या प्रसादाच्या माध्यमातून ईश्वर तुमच्या मनोकामना पूर्ण करणार असणार म्हणूनच त्या प्रसाद यांमधील थोडासा तरी प्रसाद जरूर ग्रहण करावा त्या प्रसादाला नकार देऊ नये त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आकस्मित धन. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी आकस्मिक धन सापडले तर ते धन घेण्यासाठी संकोच करू नका. जर एखादी वयोवृद्ध व्यक्ती तुम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये जर पैसे देत असेल मग ते पैसे एक रुपया, दहा रुपये,पन्नास रुपये असू द्या ते अवश्य घ्या त्या पैशास नकार देऊ नका.
या गोष्टीचे तात्पर्य हे आहे की लक्ष्मीला कधीच नाही म्हणू नका. हे सापडलेले आकस्मित धन जरी थोडेफार असले तरी ते तुमचे नशिबाची दार उघडणारे असते. आकस्मिक धन सापडणे हे त्या व्यक्तीच्या पूर्व जन्माचे फळ असू शकते म्हणून जर तुम्हाला भविष्यामध्ये कधी आकस्मिक धन सापडले तर त्या धनाला नकार देऊ नका. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आशीर्वाद. सध्याची पिढी ही या बाबतीत खूपच दुर्भाग्य आहे. अनेक वेळा आपण आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार व त्यांच्या पाया पडत नाही त्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद सुद्धा उपलब्ध होत नाहीत म्हणून आपल्या घरातील वयोवृद्ध व ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद जरूर घ्यावा कारण की या आशीर्वादामुळे तुमचे जीवन अतिशय सुफळ बनते.
जर तुम्ही कुठे बाहेर महत्त्वाचे कार्य करायला बाहेर जाणार असाल तर अशावेळी मोठ्या व्यक्तींना नमस्कार व त्यांचे आशीर्वाद जरूर घ्यायला हवा. या गोष्टीमुळे तुमचे काम लवकर पूर्ण होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोमाता. जर तुमच्या दारामध्ये कधीही गोमाता आली तर तिला कधीच हकलावू नका. तिला काही ना काही खायला द्या कारण की हिंदू धर्म शास्त्रामध्ये गोमातेला ३३ कोटी देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणूनच या गोमातेला कधीही उपाशी जाऊ देऊ नका. त्या गोमातेला काही ना काही खायला जरूर द्या. गोमातेच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव संपन्न निर्माण होणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.