या राशीचे लोकं असतात खूपच रागीट; चुकूनही यांच्या कधी वाकड्यात जाऊ नका.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या पृथ्वीतलावर मानवच असा प्राणी आहे ज्याला सर्व प्रकारच्या भावना आहेत. मानवाला दु:ख होत आनंद होतो भीती वाटते व राग सुद्धा येतो. मानवाला इतर प्राण्यांपासून हेच गुण वेगळे बनवतात. काही माणसे अति रागीट असतात. त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींवर देखील राग येतो आणि ते लहान असो किंवा मोठे कोणाचेच ऐकून घेत नाहीत. असे होण्याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म हा विशिष्ट राशी चक्रात झालेला असतो आणि या मुळेच त्यांचा स्वभाव हा रागीट असतो.
होय काही लोकांचा राशीचा स्वभाव खूप रागीट असतो. आणि ते लोक स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. या लोकांशी पंगा न घेणे चांगले. तुम्हाला ही उत्सुकता असेल या राशीं बद्दल जाणून घेण्याची तर विलंब न घालवता मित्रांनो जाणून घेऊयात या राशींबद्दल..
सर्वप्रथम जी आहे राशी ती आहे वृश्चिक राशी. वृश्चिक हि राशी मंगळची आहे तसेच त्याचा प्रतीक विंचू आहे. त्याच्या आत खूप राग आहे परंतु ते सहजपणे व्यक्त करत नाही. पण जेव्हा कोण त्यांना जास्त त्रास देईल तेव्हा त्यांना त्याचा सामना करावा लागतो. तेव्हा त्यांचा संयम राहत नाही. मात्र या राशीचे लोक अत्यंत कोमल मनाचे असतात बाहेरुन जरी रागीट असले तर त्यांचे मन निरागस असते.
या नंतरची रास जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे आहे मेष राशी. मेष ही सुद्धा मंगळाची राशी आहे. मंगळ हा ग्रह अतिशय क्रोधीत स्वभावाचा असतो. या राशींच्या लोकांवर खूप प्रभाव पडत असतो. जर कोणाशी वाद-विवाद झाला तर मेष राशीचे लोक लगेच चिडतात आणि काहीही करू शकतात म्हणूनच या राशीच्या लोकांपासून वाद विवाद शक्यतो टाळावे.
या नंतरची तिसरी राशी आहे मकर राशी. मकर रास ही शनी देवाची राशी आहे. शनी देवाला कर्म-फळ देणारे म्हणतात. सहसा हे लोक आयुष्यातील कामे ही खूप विचारपूर्वक करतात. त्यांना कोणालाही दुखवायचे नसते. परंतु त्यांना जर कोणी फसवले तर ते ती गोष्ट कधीच विसरत नाहीत आणि त्यांना सोडतही नाही. चौथी राशी आहे सिंह राशी. सिंह ही सूर्याची रास आहे. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्याचा स्वभाव खूप तापट असतो.
यामुळे सिंह राशीचे लोक खूप तेजस्वी तर असतातच पण त्यात सोबत खूप रागीटही आहे असतात. या राशीचे लोक सर्वांशी चांगले वागतात पण एखाद्यावर चिडले तर त्यांचा राग ते सहन करू शकत नाहीत आणि आटोक्यात राहत नाही. तसेच हे लोक आपल्यापुढे कोणालाही चालूही देत नाहीत स्वत: चेच खरे करतात.
पाचवी आणि शेवटची राशी आहे कुंभ राशी. कुंभ रास ही शनीची राशी आहे. या राशीचे लोक चुकीचं पाहून चिडतात. ते काही वाईट करत नाहीत, सहन नाही करत नाहीत आणि कोणाला करूही देत नाहीत. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हे त्यांच्या स्वभावातच असते. ते त्यांच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी त्यांच्या आत लपवून ठेवतात. म्हणून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. तर मित्रांनो या होत्या त्या पाच राशी ज्यांच्या ज्यांच्याशी वैर न घेणे चांगलेच. या राशीच्या लोकांशी वाद करणे टाळा आणि त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.