देवपूजा करताना नारळ खराब निघणे शकुन आहे कि अपशकुन.? ९०% लोकांना माहित नसलेलं सत्य.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व धर्मात पूजा अर्चनेला खुप महत्व असते. प्रत्येक पूजा मध्ये आपण देवी देवता यांना नारळ चढवत असतो.अनेकदा नारळ शुभ प्रतीक मानले जाते पण कधी कधी आपण देवाला दिलेला नारळ फोडल्यानंतर ते खराब निघते.त्यामुळे आपल्या मनांत अनेक शंका निर्माण होत असतात. त्या सगळ्या शंकाचे निरसन आज आम्ही या लेखात करणार आहोत तसेच त्यामागील कारण काय ते आपण जाणून घेणार आहोत.
कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ हा अत्यंत आवश्यक असतो असे म्हणतात की नारळ असेल तर आपली सगळी कामे शुभ होतात. नारळ हे एक प्रत्यक्ष लक्ष्मी माताचे रूप आहे म्हणून नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. नारळाचा वापर केल्याने माता लक्ष्मीची कृपा असते व आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपण नवरात्र मध्ये विविध मातांना नारळ अर्पण करत असतो.
कधीकधी आपण पूजा करत असताना एखादा नारळ फोडतो तेव्हा ते नारळ खराब निघतो किंवा सडलेला निघतो आणि अशा वेळी आपण घाबरून जातो. बरेच जणांना हे पाहून वाईट वाटते. काही जणांना असे वाटते की हा देवाचा कोप तर नाही. देव आपल्यावर प्रसन्न झालेला नाही, असे वाटू लागते तसेच हिंदू धर्मामध्ये खराब नारळ निघाल्याने अजिबात अशुभ मानले जात नाही.
नारळ खराब निघाल्या मुळे आपल्या जीवनात असे अनिष्ठ गोष्टी अजिबात घडणार नाही आणि म्हणूनच आपण वाईट वाटून घेता कामा नये तसेच नारळ खराब निघणे ही शुभ गोष्ट आहे. जेव्हा नारळ खराब निघतात तेव्हा देवाकडून आपल्याला संकेत मिळत असतात आणि ते संकेत समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
खराब नारळ निघाल्यावर आपल्या मनामध्ये शंका आणू नका आणि भयभीत होऊ नका तसेच हिंदू धर्मामध्ये जर फोडलेला नारळ खराब निघाला तर असे म्हणतात की देवाने तो प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण केलेला आहे.
जर तुमच्या मनामध्ये काय इच्छा असतील तर या इच्छा लवकरच पूर्ण होतील असा याचा अर्थ होतो तसेच तुमचं एखादे काम खूप दिवसापासून अडलेले आहे तर तुम्हाला असे वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तर तसेच ते काम लवकर येण्याचे योग येणार आहेत आणि म्हणूनच दुःखी होऊ नका तसेच हा देवाचा आशीर्वाद आहे.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना जर नारळ चांगला निघाला नाही तर याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा देवास मान्य आहे. एखाद्यावेळेस आपल्याकडून एक चूक होते की तो नारळ फोडल्यानंतर तोच नारळ आपण आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून खातो तसे न करता ते एखाद्या मंदिरांमध्ये किंवा शेजारी पाजारी यांना द्यावा. म्हणून जर पुढच्या वेळी तुमच्या कडून जर खराब नारळ निघाला तर वाईट वाटून घेऊ नका उलट देवावर विश्वास ठेवून आपल्या मनातील संकल्प देवा समोर मांडा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.