रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे हे 5 उपाय एकदा नक्कीच करून पहा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुष्य मंत्रालयाकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काही उपाय सांगितलेले आहेत की आपण काय काय करायला हवं आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून आपली Immunity Power म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते हे सांगितलेले आहे.
तर मित्रांनो आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण सध्या कठीण परिस्थिती आहे आणि अर्धा परिस्थिती मध्ये आपलं शरीर सदृढ, चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे या बद्दल जाणून घेणार आहोत.
पहिला उपाय आहे तो म्हणजे दिवसभर गरम पाणी पिया, म्हणजेच दिवसभरातून आपण 4-5 वेळेस तरी पाणी पियाल पाहिजे. गरम पाण्यामुळे घशामध्ये असलेले जे विषाणू असतील ते सरळ पोटात जातील, त्यामुळे रोज गरम पाणी नक्की पिया.
दुसरा उपाय आहे तो म्हणजे योगासने करणे. मित्रांनो दररोज आपण कमीत कमी 30 मिनिटे तरी योगासने केले पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
तिसरा उपाय म्हणजे हळद, जिरा, धनिया, लसूण याचा उपयोग आपण रोजच्या खाण्यामध्ये करा. कारण हे जे पदार्थ आहेत ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
चौथा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये चवनप्रश असेल तर रोज सकाळी ते आपण घ्या. एखादा डायबिटीज चा पेशंट असेल तर त्याने शुगर फ्री चवनप्रश घ्या.
पाचवा उपाय म्हणजे हर्बल टी म्हणजेच चहा. याचा आपण काढा बनवला पाहिजे, त्यामध्ये तुम्ही तुळशीची पान, दालचिनी, काळी मिरच, आलं आणि मनुके टाका आणि हे सर्व पाण्यामध्ये उकळून घ्या आणि गाळून घ्या. दिवसातून 1 ते 2 वेळेस आपण हे सेवन केले पाहिजे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर हे उपाय आपण एकदा नक्की करून बघा. त्यासोबत डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्या. तसेच ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
फार छान माहीती.आभारी आहोत.
रोग प्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी पपई सुध्दा एक चांगला मार्ग आहे अस मला वाटत
आमच्या आरोग्याची आपन एवढी काळजी घेता या बद्दल मनापासून खूप-खूप धन्यवाद!