कोणत्याही प्रकारची सूज मिनिटात उतरेल; मुकामार, रक्त साचणी ,कोणत्या प्रकारच्या गाठी लवकर होतील दूर.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर सूज आली असेल म्हणजे गुडघ्यावर, कमरेवर ,हातावर पायावर ,मानेवर, बोटांवर असणारी सूज काही मिनिटातच उतरवणारा असा प्रभावी उपाय आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत शिवाय अनेक वेळा मुक्का मार लागल्याने आपल्या शरीरावर काळे डाग पडू लागतात अशावेळी हा उपाय सुद्धा अशा जखमेवर उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय पाय मुरगळला असेल , शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी गाठी आलेले असतील तर या सर्व समस्यांवर रामबाण असा आजचा उपाय ठरणार आहे. तो उपाय कसा करायचा आहे ,हे आज आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंबेहळद लागणार आहे.
आंबेहळद आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होत असते जरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसली तरी आयुर्वेदिक दुकानांमध्ये आंबेहळद उपलब्ध होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका दगडावर किंवा सहानी वर आंबेहळद पाणी मध्ये दोन-तीन थेंब टाकून उगाळून घ्यायची आहे. निदान एक चमचा लेप निघेल एवढी आपल्याला आंबेहळद उगळायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्याचे नाव आहे रगत रोहिडा. यालाच रक्त रोहिडा असेसुद्धा म्हणतात.
याची साल आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. हि साल आपल्याला सहाणेवर थोडेसे पाणी टाकून उगाळून घ्यायची आहे त्यानंतर आंबेहळद आणि रगत रोहिडा यांना एकत्र करून गॅसवर थोडा वेळ गरम करून घ्यायचे आहे. एकदा का हे मिश्रण गॅसवर गरम केल्यानंतर आपल्याला शरीरावरील ज्या भागावर सूज आहे व गाठ आहे अशा ठिकाणी हा लेप लावायचा आहे. हा लेप लावल्यावर काही तास तसाच राहू द्यायचा आहे.
हा लेप लावल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ असेल सूज असेल काही मिनिटातच दूर होईल. तुमचा जर पाय मुरगळला असेल तर लवकर बरा होईल आणि यामुळे होणाऱ्या भयंकर वेदनेपासून तर तुमचे रक्षण कराल असा हा अगदी साधा सोपा आणि घरगुती उपाय आहे. हा उपाय आयुर्वेदिक असल्यामुळे याचा कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम शरीराला जाणवणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.