लाख रुपयांचे औषध सुद्धा यापुढे काहीच नाही; धरतीवरील अमृत समजले जाते या वनस्पतीला.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही औषधी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात परंतु या वनस्पतीचे आपल्याला अनेकदा औषधी गुणधर्म माहिती नसतात म्हणूनच बहुतेक वेळा पण या सगळ्या वनस्पतीं कडे दुर्लक्ष करत असतो.आजच्या या लेखामध्ये सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, तसेतर आपल्याला अपचनाची समस्या झाली तर आपण आपल्या घरातील बडीशोप ओवा व अन्य पदार्थांचे सेवन करत असतो.
ओवाचे सर्वांना आयुर्वेदिक फायदे तर माहिती आहे परंतु आजच्या लेखामध्ये आपण ओवा विषयी जाणून न घेता ओव्याच्या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पतीचा नेमका वापर कसा करायचा आहे व या वनस्पतीचे आपल्याला फायदे काय काय आहेत या सर्वांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्यापैकी अनेकांना अपचन होत असते, पोटामध्ये गॅस निर्माण होतो, पचनशक्ती मंदावलेली असते ,अशावेळी व्यवस्थित पचन व्हावे यासाठी आपण ओवा नियमितपणे सेवन करत असतो परंतु आज आपण ओवा विषयी जाणून घेता ओव्याच्या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. या वनस्पती बद्दल अनेकांना माहिती असेलच. या वनस्पतीच्या अंगी खूप सार्या औषधी गुणधर्म आहेत तसेच या पानांचा सुगंध सुद्धा ओव्या सारखा येत असतो.
आपण या वनस्पतीची लागवड घरच्या घरी सुद्धा करू शकतो. अनेकांना असे वाटते की जर आपण मातीमध्ये ओव्याचे बिया टाकल्या तर हे रोप उगवते परंतु तसे नसते. या रोपाचे आपण पाने जमिनीमध्ये लावले किंवा कुंडीमध्ये लावले तर त्याला पाने व मुळे फुटतात आणि अशा प्रकारे या वनस्पतीची लागवड केली जाते. हि वनस्पती आपल्याला जवळचे नर्सरी मध्ये सुद्धा उपलब्ध होते आणि म्हणूनच आपल्याला जर या रोपाचे वनस्पती चे सर्व आयुर्वेदिक औषधी गुणधर्म प्राप्त करायचे असेल तर या वनस्पतीची लागवड आपल्या गॅलरीमध्ये व बगीच्यामध्ये अवश्य करायला हवी.
या वनस्पतीच्या पानांना मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम ची मात्रा असते आणि म्हणूनच जर आपल्याला कोणतेही हाडा संबंधित आजार झाले असतील तर ते आजार दूर करण्यासाठी मदत होते तसेच यामध्ये फायबरचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याने आपल्याला पोटाच्या कोणतीही समस्या असेल तर त्या दूर होतात. हे पान आपण जर दिवसभरातून एकदा जरी खाल्ले तरी आपली पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करू लागते. वनस्पती मध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्त्व के जीवनसत्त्व अ, जीवनसत्व क तसेच अँटिऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
जर आपण ओव्याचे पान दिवसभरातून एकदा जरी खाल्ले तरी आपण नेहमी तरुण दिसतो तसेच आपल्या शरीरातील शंभरपेक्षा जास्त समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होते. हे पण नियमितपणे खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा पडत नाही कारण की या पानांमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्याने आपले वय सुद्धा जास्त असले तरी या पाण्यामुळे आपले वय कमी दिसू लागते.
अनेक जण तळणाचे पदार्थ मध्ये सुद्धा हे पान वापरून अनेक पदार्थ बनवतात अशावेळी आपण या वनस्पतींच्या पानांची भजी सुद्धा बनू शकतो. या वनस्पतीचा वापर करून आपण चहा सुद्धा बनू शकतो. ज्या पद्धतीने आपण निमित्ताने चहा बनतो त्याच पद्धतीने आपल्याला चहा बनवायची आहे परंतु चहापत्ती च्या ऐवजी आपल्याला या वनस्पतीच्या एका पानाचा तुकडा टाकायचा आहे आणि असे केल्याने चहा बनते.
ही चहा पण दिवसभरातून दोन वेळा तरी सेवन केली तरी आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होते कारण की या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जी आपल्या शरीरातील रक्तातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत करतात.
थंडीच्या दिवसांमध्ये आपण जर ही चहा बनवून प्यायली तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते पण त्याचबरोबर आपल्या शरीराला संरक्षक-कवच सुद्धा प्राप्त होते कारण की या दिवसांमध्ये अनेकदा वातावरणामध्ये थंडावा असतो व तसेच या थंडावा मुळे आपल्या शरीराला सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवत असतात म्हणूनच ही चहा तुमच्या शरीराला एक संरक्षक कवच म्हणून सुद्धा उपयोगी पडू शकते.
जर तुमच्या पोटामध्ये गॅस निर्माण झाला असेल, पोटदुखी वारंवार सतावत असेल, वेळेवर पोट स्वच्छ होत नसेल, ब”द्ध”कोष्ठ”तेचा त्रास असेल तर अशा वेळी आपण दिवसभरातून एकदा या वनस्पतीच्या पानांचे सेवन करायला पाहिजे किंवा या वनस्पतीच्या पानांचा काढा जरी आपण बनवला तरी आपले पोट नियमितपणे सर्वात स्वच्छ होते तसेच पोटाच्या संदर्भातील सर्व समस्या लवकरच नष्ट होतात जर आपले पोट स्वच्छ राहिले तर आपल्याला कोणतेच आजार होण्याची शक्यता राहत नाही.
आपल्यापैकी अनेक जण गुळाची गोळी करून या ओवा पानासोबत खातात कारण की आपण जर हे पान असेच खाल्ले तर ते चवीला तिखट असते आणि म्हणूनच चवीसाठी आपण गूळ वापरू शकतो. गूळ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तीने फक्त ओव्याचे पान सेवन करायचे आहे.
गुळ अजिबात सेवन करायचे नाही अन्यथा तुमच्या शरीरातील शुगर वाढू शकते. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या वारंवार त्रास होत असेल तर अशा वेळी या वनस्पतींची बारीक पावडर व कोरफडचा गर एकत्र करून प्रभावी जागेवर लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सांधेदुखी, कंबर दुखी, पाठ दुखी या समस्या जोर धरू लागतात अशा वेळी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.