रात्री शांत झोप लागण्यासाठी करा हे चमत्कारी उपाय., १००% फायदा होईल..!

रात्री शांत झोप लागण्यासाठी करा हे चमत्कारी उपाय., १००% फायदा होईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणाकोणाला शांत झोप येत नाही, याची कारण भरपूर आहेत. आपण अनेक प्रयोग करून बघतो कि आपल्याला या ना त्या प्रयोगाने, औषधाने, किंवा या ना त्या कडेवर झाल्यांनतर आपल्याला झोप येईल असे वाटते. परंतु शरीराला झोप ना मिळाल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला ताबडतोब दिसू शकतात.

त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला झोप येत नसेल तर आपण काय केलं पाहिजे किंवा कोणते प्रयोग केले पाहिजेत ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हि माहिती पूर्ण वाचा.

आपल्याला जर पूर्ण झोप मिळाली नाही तर आपल्या कामावर त्याचा परिणाम होतो. दिवसभराचा आपला मूड सुद्धा बदलू शकतो, तसेच थकल्यासारखे सुद्धा आपल्याला होते, चिडचिड येणे आणि या सर्वच कारणांमुळे आपल्याला शांत झोप येणे खूप गरजेचे असते.

आपल्याला कमीतकमी ८ तास झोप घेणं गरजेचं आहे. जर ८ तास आपल्याला झोप येत नसेल तर त्या झोपेचा काहीही उपयोग नाही. उदा: लहान मुलं गाढ झोपतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये चपळता आपल्याला दिसून येते. शांत आणि गाढ झोपेसाठी आपल्याला काही उपाय करता येतील. हे उपाय जर आपण योजले तर आपल्याला शांत झोप येऊ शकते.

पहिल्यांदा आपण हे करा कि आपल्या खोलीतील सर्व लाईट्स, दिवे असतील ते बंद करा. अंथरुणावर बसून काहीही निरर्थक  किंवा कंटाळवाणा आवाज काढायला सुरुवात करा. जेवढेही तुम्हाला विचित्र आवाज येतील ते काढायला सुरुवात करा. जे वेगळे आणि अनोखे आवाज काढायला तुम्ही सुरुवात कराल त्यामुळे तुम्हाला झोप येण्यास सुरुवात होईल.

आणि हे जे शब्द आहेत किंवा जो आवाज आहे हा तुमच्या भाषेतील असायला नको. तुम्हाला हे थोडेसे विचित्र वाटत असेल पण तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसुन येईल. जसे लहान मूल आवाज काढतात त्याप्रमाणे तुम्हची कुठलेही आवाज काढा फक्त ते आपल्या भाषेमध्ये नसावेत.

डोळे बंद करा, त्यामध्ये बुडून जा, आणि यामुळे तुम्हाला आनंद वाटू लागेल. हि एक अद्भुत पद्धत म्हणा, म्हणजे हि पद्धत अर्ध जागृत मनावर खोलवर जाते. मन हलकं होऊन जात. हा उपाय करत असताना तुम्हाला थोडस अवघड वाटेल परंतु त्याची सवय झाली तर तुम्हाला बरे वाटेल. तणाव हलका करणारे हि एक पद्धत आहे.

तुम्ही जर का एक आठवडा हा प्रयोग केला तर तुम्हाला नेहमी चांगली झोप येत जाईल. चांगल्या झोपेचा अनुभव तुम्हाला येईल. हा उपाय जर तुम्हाला जमलं नाही तर आणखी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगतो.

रात्री जे आपण जेवण करतो ते हलके असावे. अतितिखट किंवा मांसाहारी पदार्थ शक्यतो टाळावे. जास्त पाणी पिऊ नका कारण तुम्हाला लघवीला वारंवार जावं लागेल. त्यामुळे तुमची झोप उडेल. रात्री सुमधुर संगीत ऐकल्यानेही तुम्हाला चांगली झोप येऊ शकेल.

आपण ज्या बेडवर झोपतो तिथे कुठलीही अन्य वस्तू ठेऊ नये, म्हणजेच त्या वस्तूंचा वापर आपण करणे टाळावे. मोबाईल असेल किंवा पुस्तक असेल या वस्तू आपण लांबच ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण सर्व चिंता दूर करून आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कितीही चिंता असेल तरी त्यामधून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

झोपण्यापूर्वी डोक्याची तेलाने मालिश करा. व्यायाम करा, नियमित व्यायाम केल्याने सुद्धा फायदा होतो त्यामुळे रक्तभिसरण चांगले होते आणि शांत झोप लागते. देवाची प्रार्थना, प्राणायाम असे बरेच आपण केले पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागायला मदत होते.

शक्यतो खराब वातावरण असेल, किंवा एखादे चांगले काम नसेल तर ते करू नका. जास्त अपेक्षा न ठेवता आपण सतत विचार करणे टाळले पाहिजे. बियर, सिगरेट, कॉफी यापासून दूर रहा. जास्तवेळ मोबाईल किंवा टीव्हीचा वापर करू नका. तसेच वडापाव, पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ रात्री खाणे टाळा.

तर मित्रानो हे सर्व उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला चांगली झोप येण्यास नक्कीच मदत होईल. हि माहिती जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *