झोपण्यापूर्वी फक्त १ वेळा बोला हा मंत्र.. सकाळी पहा चमत्कार..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण ज्यावेळी रात्री झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल, आज काय झाले.? जर एखादी अडचण असेल तर आपण त्यावर विचार करत बसतो. परंतु खरंतर रात्री झोपताना भगवंतांचे नाव घेऊन झोपावे. आपण जो विचार करून झोपतो तेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पुढे येते.

जर तुम्हाला काही अडचण असेल घरात भांडणे, वादविवाद होत असतील, काही केल्या समाधान वाटत नसेल, एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असा चमत्कारी मंत्र सांगणार आहोत जो देवी जगदंबेचा मंत्र आहे. जो खूपच प्रभावी आहे आणि त्या मंत्राचा विशेष असा आहे कि या मंत्राचा फक्त एकदाच जप केला तरीही सकाळी आपली सर्व कामे सहज होतील.

आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील. आपली काही अशी कार्ये होतील ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल. सर्वजण आपले म्हणणे ऐकतील. तसे आजकाल सर्व याच काळजीत असतात कि उद्याचा दिवस कसा असेल, हे बहुतेक सर्वांबरोबर होते. कारण आज आपल्यासोबत एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही. आपल्याला उद्याची चिंता लागते कि उद्या काय होईल. उद्या आपल्याबरोबर कोणते नवीन संकट आव आसून उभे राहील. आपण याच काळजीत राहतो व जे करायचे ते राहूनच जाते.

जास्त चिंता केली कि आपल्याला मानसिक आजारही भिडसावतात व गंभीर आजारही होऊ शकतात. या सर्व परिस्थितून तुम्ही जात असाल तर आज आम्ही तुम्हाला देवी आईचा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही रात्री एकदा बोलून एक ग्लास पाणी पिऊन झोपून घ्यावे.

ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

हा दुर्गादेवीचा खूपच चमत्कारिक व शक्तिशाली मंत्र आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे कि सर्वांचे मंगल करणारी, कल्याण करणारी हे देवी मी तुला शरण आलो आहे. मी तुझ्या चरणाला नमन करतो. मला सुख व आनंद प्रदान कर व माझे जीवन सुखी व मंगलमय कर.

हा मंत्र रात्री झोपताना एकदाच अगदी मनोभावे सांगायचं आहे. याचा प्रभाव इतका छान आहे कि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला याचा अनुभव येईल. तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुमची जी कामे अडली असतील ती मार्गे लागतील. तुमचे शत्रूही तुमचे मित्र होतील. जो व्यक्ती सव्वा महिना या मंत्राचा नित्य १०८ वेळा जप करतो त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते. आई जगदंबेच्या कृपेने तो व्यक्ती वाचा सिद्धी प्राप्त करतो. अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते तिथे स्वतःचे तर कल्याण करतेच परंतु आपल्या आसपासच्या सर्वांचेही कल्याण करते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्की आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रणींना नक्की शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *