अंगाला खाज, खरुज, पुरळ, एँलर्जी, लाल लाल होणे. अंगाला लावा या झाडाची पावडर

अंगाला खाज, खरुज, पुरळ, एँलर्जी, लाल लाल होणे. अंगाला लावा या झाडाची पावडर

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुमच्यासाठी अंगाला खाज येणे, खरूज येणे, पुरळ येणे, लाल होणे कुठल्याही प्रकारची ऍलर्जी होणे यासारख्या समस्यांवर घरगुती अ त्यं त नॅचरल आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने अगदी सहजतेने आपल्या या समस्या कधी निघून गेल्या हे आपल्याला देखील कळणार नाही.

यासाठी आपल्याला लागणार आहे कडुनिंबाच्या झाडाची पाने. कडुनिंबाची पाने घेऊन ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. आणि छान खणखणीत वाळवून याची पावडर तयार करून ठेवा. म्हणजे आपल्याला हवी तेव्हा आपण याचा वापर करू शकतो. तुमच्याकडे जर कायम ताजी पाने मिळत असतील तर तुम्ही त्या पानाचा देखील वापर करू शकता.

कडूलिंबाची पाने वाळून घ्यायची आहेत. मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. अर्धा चमचा भरुन कडुलिंबाच्या पानांची पावडर आणि दुसरे म्हणजे मोहरीचे, राईचे, सरसोचे तेल आपण घ्यायचे आहे आणि 1 चमचाभरून तेल बारीक केलेल्या पावडरमध्ये टाका. आणि 2 चुटकीभरून हळद पावडर टाकायचं आहे. आणि हे छानप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.

याचे छान पेस्ट तयार होईल. योग्यप्रकारे मिक्स झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला खाज येत आहे, खरूज आहे, डाग पडले आहे त्या ठिकाणी लावून 15 मिनिटं मसाज करायचं आहे. आणि त्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटे सोडून द्यायचे आहे. आणि नंतर नॉर्मल कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.

आपण हे अंघोळ करण्याच्या अगोदर देखील करू शकतो किंवा दिवसभरातून कधीही केले तरी देखील चालेल. जास्त ऍलर्जी असेल किंवा जास्त समस्या असतील तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून 3 वेळेस करा. यामुळे एकाच दिवसात लगेच यापासून आपल्याला फायदा जाणवेल. इतका इफेक्टिव आणि फायदेशीर उपाय आहे नक्कीच करून बघा.

नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही जी क्रीम आहे ती आपण एका वेळी जास्त देखील तयार करून ठेवू शकतो. एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला हवे त्यावेळेस आपल्याला ही लावता येते.

आणि बर्‍याच जणांना कायमच हा त्रास होत असतो तर अशा व्यक्तींनी या क्रीमचा वापर तर करायचं आहे. परंतु 2 चुटकी भरून कडुलिंबाच्या पानांची पावडर घ्यायचे आहे आणि दररोज सकाळी एक ग्लास भरून कोमट पाण्यामध्ये टाकून हे पाणी पिऊन घ्यायचे आहे.

जर तुम्हाला हे पिले जात नसेल तर यामध्ये तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता. यामुळे शरीराच्या अंतर्बाह्य समस्या पूर्णपणे निघून जातात आणि आपल्या शरीराला याचा संपूर्ण तरी फायदा होतो. आहे की नाही अगदी साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *