अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव; हि सत्य घटना वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.!

अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव; हि सत्य घटना वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे जगभरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाल्यास आपले जीवन सार्थकी लागेल. जेवढ प्रेम स्वामी भक्तांचे स्वामींवर आहे तेवढेच प्रेम स्वामींचे आपल्या भक्तांवर आहे. त्यांनी अनेक वेळा आपल्या भक्तांना संकटाच्या काळात मदत केली आहे. मित्रांनो आम्ही आज आपणास स्वामींचा एक थरारक अनुभव सांगणार आहोत तो ऐकल्यावर तुमच्या ही अंगावर काटा येईल हा अनुभव आला आहे मिरज येथील स्वामीभक्त अजय कुलकर्णी यांना चला तर जाणून घेवू नक्की कोणता आहे हा अनुभव.

अजय कुलकर्णी यांनी 2007 साली बी कॉम प्रवेश घेतला होता आणि त्याच वर्षी त्यांच्या वडिलांना कैंसर झाला सुदैवाने व स्वामी कृपेने ते त्यातून बाहेर पडले मात्र एक वर्ष होत नाही तोच त्यांना हार्ट ऐट्याक झाला आणि हा एवढा भयानक होता की त्यांना तातडीने 42,000 च इंजेक्शन द्याव लागल त्यातून बाहेर आले पण त्यांना दहा पावलं सुद्धा निट चालता येत नव्हत मग डॉक्टरांनी अंजीयोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी अंजीयोग्राफी केली व त्यात 100% क्लॉकेज दाखवले गेले.

त्यांनतर त्यानी बाबांना के.एल.ई बेळगाव येथे पुढील उपचारांसाठी घेवून जायचे ठरले. त्यावेळी अजय कुलकर्णी खूप लहान आणि त्यांच्या दोन बहिणी होत्या कोणी ही नातेवाईक त्यांच्या मदतीला येत नव्हते. सगळे त्यांना हेच सांगत होते की हे इस्पितळ खूप मोठ आहे यासाठी खूप पैसे लागतील अस आणि तस. अजय 20000 रुपये घेवून बेळगावला निघाले ते रेल्वे मध्ये बसले आणि स्वामींना मनात म्हणाले तुम्ही पाठीशी असाल तर शस्त्रक्रिया होवू देवू नका.

तिथे माधव दिक्षीत म्हणून डॉक्टर होते त्यांची भेट सुद्धा दुर्मिळ त्यांनी पैसे भरले रक्त दिले आणि ते भावोजींना तिथेच थांबवून ते मिरजला आले. दुसर्या दिवशी सगळी तयारी झाली बाबांना ऑपरेशनसाठी घेवून गेले सगळ्या मशिनी लावल्या गेल्या डॉक्टर दिक्षीत यांनी बाबांची अंजियोग्राफीची सीडी पहिली व ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला.

त्यांनी डॉक्टरांना रिस्क घेवून ऑपरेशन करण्यास सांगितले मात्र डॉक्टर म्हणाले मी माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून सांगतोय आणि मी जर या माणसाला ‘फा’ड’ल’ तर हा माणूस जाग्यावरच मरण पावेल. त्यानंतर अजय कुलकर्णी हे स्वामींच्या फोटो पुढे रडू लागले हे तुम्हीच केलत का अस विचारु लागले तेवढ्यात फोटोवरुन एक फूल खाली पडले आणि त्यानंतर जेमतेम बाबांनी सहा महिने औषधं घेतली आणि आज सहा वर्ष झाली आज बाबा ठणठणीत बरे झाले.

आत्ता ते नियमित दोन किलोमीटर चालतात स्वामी भक्ती करतात. मित्रांनो अनेकांना स्वामींनी अशीच मदत केली आहे. माणसाची निती साफ असेल तर तो कोणत्या ही संकटावर मात करु शकतो. त्यामूळे या जगात आल्यावर एक सुखी समाधानी जिवन जगायचे असेल तर नेहमी सत्य आणि नेकीच्या मार्गावर चला स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *