पहा कोरफड खाण्याचे १० जबरदस्त फायदे जे तुम्ही कधीच ऐकले नसतील..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोरफड हि अत्यंत गुणकारी वनस्पती आहे, कोरफडीचा रस त्वचेवर लावल्यास त्याचे भरपूर फायदे दिसून येतात. तसेच हा रस केसांच्या आणि इतर ठिकाणी मात करतो. बाल्कनीत किंवा आपल्या बागेमध्ये कुठेही आपण याला लावू शकतो. वाढीसाठी पाणी देखील खूप कमी लागते.
कोरफडीच्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. या रसाचा वापर तुम्ही सकाळी एनर्जी ड्रिंक म्हणूनही करू शकता. त्याचप्रमाणे एक ग्लास कोरफडीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोट्याशियम आणि लोह असते. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंस्था शांत राहते.
आपल्या शरीरातील दाह आणि जळजळ कमी होण्यास देखील मदत होते. उन्हाळ्यामध्ये हा रस पिणे अत्यंत उपयोगी आहे. ज्या व्यक्तींचे गुडघे किंवा सांधे दुखतात त्यांनी हा रस रोज घ्यावा. स्नायूंच्या दुखण्यावरही हा रस मात करतो.
कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आढळतात. यामुळे ते तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते. तसेच तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते. तुम्हाला माहिती आहे का..? कोरफडीचा रस हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो.
याच्या रोजच्या सेवनाने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास हे कोरफड मदत करते. आणि पोटाची समस्या सुद्धा सुरळीत होते. जर तुम्ही कोरफडीचा रोज सेवन करत असाल तर तुमच्या रक्तामधील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. रोज सकाळी कोरफडीचा रस सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते, आणि दिवसभर पचनसंस्था सुरळीत काम करते.
एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा कोरफडीचा रस टाका आणि सकाळी या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी हाच एक नैसर्गिक पर्याय आहे. सर्दी आणि खोकला असेल तर या रसाचा वापर नक्की करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.