अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर ‘ही’ ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत, जाणून घ्या बचावाचे उपाय
नमस्कार मित्रांनो,
ठळक मुद्दे : जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृदयाच्या आजारांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार लघवी येते आणि हृदय देखील खूप वेगाने धडधडू लागते.
आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले पाहायला मिळतात. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक गंभीर आजारांचे शिकार आहे तर काहींना सामान्य समस्या उद्भवत आहेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त पुरूषांमध्येच नाही तर मोठ्या संख्येनं महिलांमध्येही हृदयाचे आजार उद्भवताना दिसतात. दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.
जगभरातील लोकांना हृदयाच्या आजारांबाबत जागरूक करणं हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधाल.
श्वास घ्यायला त्रास होणं.
आपल्या सर्वांना माहित आहे की छातीत दुखणे आणि दम लागणे ही हृदयाच्या विकाराच्या झटक्याची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. परंतु जर तुम्हाला काही पायऱ्या चढताना थकल्यासारखं वाटत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.
पाठीच्या वरच्या भागात वेदना.
जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा रुग्णाला पाठीच्या वरच्या भागात वेदना होतात. परंतु जर यासह तुम्हाला छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता येत असेल, जडपणा जाणवत असेल, मळमळ किंवा उलटीसारखे वाटत असेल तर हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
भूक कमी होणं, सूज येणं.
जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृदयाच्या आजारांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार लघवी येते आणि हृदय देखील खूप वेगाने धडधडू लागते. कधीकधी आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, परंतु ती हृदय विकाराच्या झटक्याची चिन्हं असू शकतात. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे.
अशी घ्या काळजी : 1) हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, तेळकट, उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
2) हृदय निरोगी ठेवण्यासाठी अक्रोड, बदाम, फ्लेक्ससीड, सोयाबीन आणि सॅल्मन मासे खाऊ शकता.
3) नियमित व्यायाम केला पाहिजे.
4) समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.