तुळशी वाळली तर काय करावे.? तुळशी लाकूड (काष्ठ) काय करावे.? एकदा नक्की जाणून घ्या.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे फार महत्त्व आहे. तुळशी आपल्या जीवनासाठी फार उपयोगी आहे. तुळशीचे धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही खूप फायदे आहेत.आपल्या घरातील तुळस हिरवीगार व सुंदर असावी यासाठी आपले नेहमीच प्रयत्न चाललेले असतात. आपण सकाळ संध्याकाळ पूजा करतो. दररोज तुळशीला पाणी अर्पण करतो, अशा प्रकारे घेता येईल तेवढी काळजी घेत असतो परंतु तरीही कधीकधी आपल्या दारातील तुळस वाळून जाते अशा वेळी काय करावे.
जर आपल्या अंगणा समोर आलेली तुळस जर वाळली असेल तर ती दारासमोर ठेवू नये ती त्वरित काढून त्या जागी नवीन हिरवीगार तुळस आपल्याला लावायला हवी. जर तुळशी आजूबाजूला हिरवळ असेल आणि काड्या फक्त सुक लेले असतील तर अशा वेळी आपल्याला वरील सुकलेला भाग काढून टाकायचा आहे. संपूर्ण तुळस सुकलेली असेल तर सुकलेली तुळस आपल्या घरामध्ये ठेवू नये. ती तुळस काढून त्याजागी नवीन हिरवीगार तुळस आपल्याला आणायला पाहिजे.
तुळशीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत असे तुळशीला मातेचा मान देखील देण्यात आलेला आहे. सुकलेली तुळस आपल्याला नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करायची नाही किंवा अन्य ठिकाणी टाकायचे नाही.ज्या सुकलेल्या काड्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे आपल्याला काळजी घ्यायची आहे. जी सुकलेल्या तुळशीच्या काड्या आहेत त्या आपण व्यवस्थित सांभाळून ठेवून त्याची पावडर देखील बनवू शकतो आणि एका कपड्याने आपण ती पावडर गाळून घ्यायची आहे.
या पावडरचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा करू शकता. आपल्यापैकी अनेक जण पूजा-अर्चना करत असतात. भगवान श्रीविष्णूची पूजा आराधना करत असतात. आपल्या देव्हारामध्ये जे देव आहेत त्यांना आपण चंदनाचा टीका लावत असतो, अशावेळी तुम्ही या पावडर द्वारे श्री भगवान विष्णू यांना या पावडरचा टिक्का लावू शकता. तुम्ही ही पावडर चंदना मध्ये मिक्स करून श्रीहरी विषयांच्या कपाळी लावू शकता. आपल्या सर्वांना माहिती आहे कि, भगवान विष्णूंना तुळशी खूपच प्रिय आहे.तुळशी भगवान विष्णूंची परमभक्त होती.
जर तुम्ही नेहमी भगवान विष्णू यांची पूजा करताना चंदनाच्या पावडरमध्ये तुळशीची पावडर मिक्स करून टिळा लावल्यास भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. तुमच्या जीवनातील सर्व अंधकार दूर होऊन जाईल. भगवंतांची पूजा अर्चना केल्यानंतर घरातील इतर अन्य सदस्यांनी देखील आपल्या कपाळाला लावायला हवा, असे केल्याने तुमचे मन चित्त एकाग्र राहील. तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहे , तणाव निर्माण झालेला आहे,तो पूर्णपणे दूर होऊन जाईल.
भविष्यात तुम्ही जे कार्य हाती घेणार आहात या कार्यामध्ये तुमचे मन एकाग्र होईल. तुमचे मन भटकणार नाही आणि म्हणूनच जर मन एकाग्र झाल्यास त्या कार्यामध्ये देखील नक्कीच यश प्राप्त होईल. जर तुमच्या कडे सुकलेल्या तुळशीच्या काड्याची पावडर जास्त प्रमाणात तयार झाली असेल तर अशा वेळी घरातील सदस्यांनी तुळशीच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून दिवसभरातून एकदा हे चूर्ण सेवन करायचे आहेत, असे केल्याने तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होतील. जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा समाविष्ट असेल तर ही नकारात्मक ऊर्जा तुळशीच्या पावडरच्या सेवनाने पूर्णपणे निघून जाणार आहे तसेच तुमच्या आजूबाजूला वातावरण सकारात्मक निर्माण होईल ओईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.