वास्तुशास्त्रानुसार या 2 मूर्ती घरात या जागी एकत्र ठेवल्याने होईल खूपच भरभराट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले दुःख दूर व्हावेत. आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी, आपल्या घरात सुख-समृद्धी राहावी यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांची आराधना करत असतो , देव्हाऱ्यात देवांची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजन करतो. प्रत्येकांच्या देव्हाऱ्यात वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो असतात परंतु आपल्या देवघरात दोन मूर्त्या ठेवलेल्या असतील तर राजयोग जुळून येतो. आपल्या घरात सुख समृद्धी नांदते . आपल्या मनामध्ये त्या बद्दल भावना असते अशा देवी-देवतांची मूर्ती व फोटो आपण आपल्या देव घरामध्ये ठेवत असतो.
देवघरामध्ये या दोन देवी देवतांच्या मूर्त्या जर आपण ठेवले तर आपले भाग्य उजळून निघते तसेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते तसेच शुभ संकेत सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ लागतात. जर आपल्या देवघरामध्ये श्रीकृष्ण यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अशावेळी राधा राणी चा फोटो किंवा मूर्ती सुद्धा ठेवायला हवी. श्री हरी कृष्ण व राधा राणी हे प्रेमाचे प्रतीक आहेत ज्यांच्या घरात श्री हरी कृष्ण व राधा राणीचा फोटो किंवा मूर्ती असते अशा घरांमध्ये सुख नेहमी नांदू लागते. पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही तसेच त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख शांती लाभते.
पती-पत्नी यांचे संबंध मधुर होतात. त्याचबरोबर आपल्या घरातील धनधान्यामध्ये सुद्धा वाढ होऊ लागते. आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये माता महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली असते व फोटो असतो. माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. आपल्यापैकी अनेक जण माता महालक्ष्मीची पूजा आराधना करतात परंतु अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की अशा वेळी श्री विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी की नाही परंतु ज्या घरांमध्ये माता महालक्ष्मी यांच्यासोबत श्री विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असते त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये वास्तव्य करत असते.
ज्या ठिकाणी माता महालक्ष्मी असते तिथेच श्री विष्णू सुद्धा असतात. जर तुमच्या देवघरामध्ये श्री विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अशावेळी माता महालक्ष्मी यांच्या उजव्या बाजूला गणपती व डाव्या बाजूला श्री कुबेर यांचा फोटो अवश्य ठेवायला हवा. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे तसेच आपल्या जीवनातील संकट दूर करणारे विघ्नहर्ता सुद्धा आहेत.
श्री कुबेर धन देवता आहे त्यांच्या कृपेने विश्वामध्ये धनसंपत्ती खूप मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहे. आपल्या घरात श्रीराम दरबाराचा फोटो जरूर असावा यामुळे आपल्या घरात शांतता व समृद्धी नांदते. घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते व भांडण होत नाही. पती-पत्नीचे प्रेम एकमेकांवर जीवापाड प्रेम राहते. भगवान श्री कृष्णाची मूर्ती देवघरात असणे शुभ मानले जाते.
श्री कृष्ण व राधा यांचा एकत्रित असलेला फोटो व या फोटोमध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत असा फोटो सुद्धा घरांमध्ये लावणे शुभ मानले जाते यामुळे बासरीच्या प्रसन्न स्वर ध्वनीमुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण तयार होते व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक उर्जा असेल ती निघून जाते. ज्या घरामध्ये एकाक्ष नारळाची नेहमी पूजा केली जाते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते, त्या घरांमध्ये नेहमी पैसे येऊ लागतो.
अशा घरांमध्ये भविष्यात कधीच अन्नधान्याची कमतरता लाभत नाही. आपल्या घरामध्ये प्रेम सद्भावना व समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरामध्ये राम राज्य दरबाराचा फोटो अवश्य लावायला हवा यामुळे आपल्या घरामध्ये एकता टिकून राहते. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर पितळेचे सूर्य मूख असायला हवे तसेच आपल्या घरातील गणपती उजव्या सोंडेचा असायला हवा तसेच त्या सोंडमध्ये लाडू सुद्धा असायला हवा. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत असते.
आपण ज्या ठिकाणी काम करतो, आपले जेथे दुकान आहे अशा ठिकाणी श्री गणेशांची उभी असलेली प्रतिमा आपल्याला लावायची आहे व या प्रतिमांमध्ये श्रीगणेशाची पाय जमिनीवर आहे याची खात्री करायला हवी अशा प्रकारचा फोटो आपल्याला आपल्या दुकानांमध्ये ईशान्य दिशेला लावायचा आहे यामुळे आपल्या दुकानांमध्ये भरभराट होते.
ज्या घरामध्ये नियमित शंखाची पूजा केली जाते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते. आपण सर्वांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपली कुलस्वामिनी व कुलदैवत यांची प्रतिमा अवश्य असायला हवी. आपले कुलदैवत आपल्या कुटुंबाचे व आपल्या कुळाचे संरक्षण करत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदैवत व कुलस्वामिनी यांची प्रतिमा व मूर्ती असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी जर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असतील तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंद निर्माण होईल व त्याचबरोबर तुम्हाला सर्व गोष्टींचा भरभरून उपभोग सुद्धा घेता येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.