हा’निका’रक चाय आणि कॉफी आजच सोडा; फक्त या पाच आरोग्यदायी एनर्जी ड्रिंकचा करा वापर.!

हा’निका’रक चाय आणि कॉफी आजच सोडा; फक्त या पाच आरोग्यदायी एनर्जी ड्रिंकचा करा वापर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की चहा व कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅफेनची मात्रा असते. जेव्हा आपण चहा-कॉफीचे वारंवार सेवन करतो त्यामुळे याची सवय लागून जाते आणि नंतर ही सवय व्यसनांमध्ये रूपांतरित होऊन जाते त्यामुळे अनेकदा आपल्याला बेचैनी वाटते, डोकं दुखू लागते, आळस येऊ लागतो या सारखे सगळ्या सवयी आपल्याला उद्भवत असतात. जर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण काही पेय चा वापर केला तर यामुळे आपल्याला उर्जा सुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर आपले शरीर मजबूत सुद्धा होईल.

आपल्या आजूबाजूला असे काही पेय पदार्थ असतात ज्यामुळे आपण यांचे सेवन केल्याने आपले शरीर नेहमी तरतरीत राहते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या सुद्धा होत नाही. या सवयीचे व्यसनांमध्ये रूपांतर सुद्धा होत नाही. आपल्यापैकी अनेक जणांना चहा व कॉफी यांचे होणारे विपरीत परिणाम याबद्दल फारशी कल्पना नसते म्हणूनच आपण जर बघितले तर आपल्या इथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण चहा व कॉफी यांचे वारंवार सेवन करत असतात आणि की लहान मुले सुद्धा मोठ्या माणसांना चहा व कॉफी यांचे सेवन करताना पाहत असतात आणि कालांतराने ते सुद्धा या पदार्थांचे सेवन करतात यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो याची आपल्याला जाणीव नसते. कॉफी व चहा त्यांचा जास्त परिणाम आपल्या त्वचेवर होतो.

जास्त प्रमाणात चहा व कॉफी प्यायल्याने आपले शरीर व त्यावरील त्वचा आतून फाटू लागते व कालांतराने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात व चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धां लवकर निर्माण होतात. अनेकदा आपण चहा व कॉफी ह्यामध्ये साखर मिक्स करत असतो आणि साखर आपल्या शरीराला चांगली नसते. ज्या पद्धतीने गांजा अफू यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला व्यसन लागते त्याच पद्धतीने साखर सुद्धा या पदार्थांचा तेवढीच दूरपयोगी मानली जाते चहा-कॉफी यांचे नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीराला हार्मोन्स असंतुलन यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच मानवी शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडू लागतात व हे बदल अनेकदा हानिकारक ठरतात.

अनेकदा आपण सकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा व कॉफी यांचे सेवन करत असतो परंतु सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲसिड निर्मिती झालेली असल्याने अशा वेळी जेव्हा आपण चहा पितो तेव्हा त्या एसडीटी परिणामामुळे सुद्धा नको ते आजार आपल्याला होतात व अनेकदा आपल्याला ब्लड प्रेशर समस्या सुद्धा निर्माण होते म्हणूनच दिवसभरातून कमीत कमी वेळा चहा व कॉफी यांचे सेवन करायला हवे. चला तर मग जाणून घ्या चहा व कॉफी याऐवजी आपल्या शरीराला हानिकारक असणाऱ्या काही सॉफ्ट ड्रिंक बद्दल जाणून घेणार आहोत.या ड्रिंक्स चे सेवन केल्याने आपल्या शरीराला दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही.

मॅचा टी ही जपानमध्ये सर्वात जास्त प्यायली जाणारी चहा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जपान मधील लोक आपल्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात व त्यांचे आयुष्यमान सुद्धा जास्त आहे कारण की इकडची लोक मॅचा चाहवजास्त प्रमाणामध्ये पीत असतात. ही चहा आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे तसेच यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट आणि क्लोरोफील चे प्रमाण जास्त असते आणि यामुळे आपल्या शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. आपल्या मेंदूला चांगली ऊर्जा प्राप्त होते व आपले शरीर सुद्धा नेहमी टवटवीत राहते.

बहुतेक वेळा आपण साधारण चहा बनवताना यामध्ये चहापत्तीचा समावेश करतो आणि चहा गाळत असताना चहापत्ती उरली असेल तर फेकून देतो परंतु हीचहा वनस्पतीच्या पानांना बनलेली असते आणि ही चहा आपल्याला पावडर स्वरूपामध्ये उपलब्ध असते आणि म्हणूनच वाया जाण्याची शक्यता सुद्धा कमी असते. ही चहा प्यायलाने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते व त्याचबरोबर यामध्ये काफेन त्यांचे प्रमाण सुद्धा कमी असते. ही चहा सेलिब्रिटी पासून ते अनेक स्पोर्ट पर्सन सुद्धा सेवन करत असतात त्याचबरोबर ही चहापत्ती तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होऊ शकते ही चहा स्ट्रोग असल्याने सुरुवातीला कमी मात्रा मध्ये सेवन करा त्यानंतर जसेजशी तुम्हाला या चहाची सवय होईल त्यानंतर तुम्ही याची मात्रा वाढवू शकता.

या चहा चे सेवन केल्याने आपल्या शरीराला चांगले गुणधर्म प्राप्त होतात त्याचबरोबर आपला मेंदू चांगला कार्य करू लागतो व त्यामुळे मानसिक तणाव सुद्धा आपल्याला उद्भवत नाही तसेच आपले डोके नेहमी शांत राहते आणि यामुळे आपल्याला नेहमी प्रसन्न वाटू लागते त्यानंतर ची दुसरी चहा आहे ती म्हणजे बार्ली चहा. बार्ली चहा म्हणजे या पदार्थाचा उपयोग चहा बनविण्यासाठी अनेक काळापासून जपान चायनीज कोरिया यासारख्या देशांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये केला जात आहे याचा उपयोग अनेक पोषक तत्वमध्ये होतो तसेच वेगवेगळे धान्य पिठामध्ये सुद्धा केला जातो.

बार्ली पदार्थापासून बनवलेला चहा अत्यंत उपयुक्त ठरते त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते पण त्याचबरोबर आपले रक्त शुद्ध होते आणि यामुळे त्वचा टवटवीत राहण्यासाठी मदत होते.त्वचेवर कोणत्याही प्रकारचे पिंपल्स काळे डाग आले असतील तर तेसुद्धा याच्यामुळे निघून जातात. बार्ली चहा प्यायल्या ने आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना कॉफी पिण्याची भरपूर सवय असते अशा लोकांना चिकोरी कॉफी पर्याय म्हणून उपलब्ध आहे.

ही कॉफी चवीला कडू असते आणि म्हणूनच आपल्याला दुधा सोबत घेणं गरजेच आहे त्याचबरोबर चवीसाठी तुम्ही यामध्ये खजूर सुद्धा टाकू शकता ज्यामुळे तुम्हाला ही कॉफी गोड लागू शकते. चिकोरी कॉफी मध्ये कॅफेन प्रमाण सुद्धा कमी असते आणि ही कॉफी तुम्हाला सहज ऑनलाइन उपलब्ध होत जाते ही आपल्या कॉफी सारखीच असते आणि सगळीकडे सहज उपलब्ध होऊन जाते. त्याचबरोबर आता चहा ऐवजी व्हाईट टी म्हणजे सफेद चहा सुद्धा आपण पिऊ शकतो.

ही चहा जगातील सर्वात चांगला चहा पैकी एक मानली जाते आणि तेही चहा अगदी हलके असते आणि पचायला सुद्धा सहज सोपी असते आणि यामुळे आपली पचनसंस्था चांगल्या पद्धतीने कार्य करते यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्त्वे उपलब्ध असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला मजबुती सुद्धा प्रदान करते. याच्यामध्ये अँटिऑक्सिडंट ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी मदत होते त्याचबरोबर ही चहा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तसेच ब्लडप्रेशर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच या सर्व गोष्टींमुळे आपला मेंदू नेहमीच टवटवीत राहतो कोणत्याही प्रकारचा आळस आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नाही.

गुळवेल चहा ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.ही चहा आपल्या शरीराला शीतलता प्रदान करते आणि म्हणूनच ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणात असते अशा व्यक्तीने जरी गुळवेलची चहा प्यायल्याने त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते व त्यानंतरची सर्वात महत्त्वाची चहा म्हणजे जास्वंदाची चहा .जास्वंदा मध्ये असे काही औषधी गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी पित्त बाहेर पडण्यासाठी मदत होते व त्याच बरोबर आपले शरीर नेहमी मजबूत बनते व आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा चांगली राहते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *