असा गुलाब असेल तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा होतील पूर्ण; करा या गुलाबाचा असा वापर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा गुलाबाच्या फुलाचा रंग पांढरा ,गुलाबी आणि लाल असतो तसे तर आता निळे काळे आणि इतर विविध रंगांचे गुलाब देखील बाजारात दिसून येतात पण गुलाबी रंगांची फुले अधिक संख्येत मिळत असल्यामुळे सर्वांना प्रिय आहे याचे अनेक फायदे आहेत.यांचा वापर करून आपले जीवन सुखी करू शकतो हे खूपच कमी लोकांना माहित आहे म्हणूनच गुलाबाच्या फुलांचे काही सोप्या भाषेत आपण टोटके जाणून घेणार आहोत.
जर आपली कोणतीही मनोकामना पूर्ण करायची असेल तर कोणत्याही शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी आपल्याला पंधरा गुलाबाचे फुल घ्यायचे आहेत आणि हनुमान यांच्या चरणी अर्पण करायचे आहे असे केल्याने आपले सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.गुलाबाचा उपयोग धनप्राप्तीसाठी सुद्धा केला जातो. एखाद्या संध्याकाळी गुलाबाच्या फुलामध्ये कापूर जाळून टाकावा.
कापूर जाळल्यानंतर ते फुल देवीला अर्पण करावे असे केल्याने आपल्याला अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येतात. जर आपली तिजोरी नेहमी भरलेली असावी असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला मंगळवारच्या दिवशी लाल गुलाब चंदन आणि लाल रंगाचा धागा एकत्र घेऊन आपल्याला लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचे आहे. ही गाठोडी आपल्याला एका आठवड्यासाठी मंदिरामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर आपल्यालाही गाठोडी आपल्या घरातली तिजोरीमध्ये किंवा दुकानातील तिजोरीमध्ये ठेवायचे आहे, असे केल्याने पैसा कायमस्वरूपी टिकून राहील.
जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असेल काही केल्या आजारपण कमी होत नसेल वारंवार घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर अशा वेळी आपण गुलाबाच्या साह्याने हा उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याचे पान घ्यायचे आहे त्यावर लाल रंगाचे गुलाब घेऊन थोडेसे बत्तासे घ्यायचे आहेत आणि आपल्याला या तिन्ही वस्तू आजारी असलेल्या व्यक्तीच्या अंगावरून एकतीस वेळा उतरवायचे आहे आणि त्यानंतर हे सगळे वस्तू चार रस्ता म्हणजेच ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी टाकून यायचे आहे.
आपल्यापैकी अनेक जण कर्जाने त्रस्त असतात कर्ज दूर करण्यासाठी व कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. गुलाबाचा वापर करून सुद्धा आपण आपल्या कर्ज मुक्त करू शकतो यासाठी आपल्याला पाच पांढरे गुलाब घ्यायचे आहे व सव्वा मीटरचा पांढरा कपडा घ्यायचा आहे. आता ही पाच गुलाब आपल्याला कपड्याच्या चारी टोकाला बांधायचे आहेत आणि पाचवा गुलाब मधोमध बांधायचा आहे.
अशा पद्धतीने हे बांधलेले गुलाब आपल्याला नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत आणि दुसरा उपाय म्हणजे आपण एका पांढ-या कपड्यामध्ये चांदीचे पान त्यावर काही अक्षता हे सगळे पदार्थ व गुलाब रुमालामध्ये बांधून श्रीविष्णू व माता महालक्ष्मी यांच्या मंदिरात जायचे आहे तेथे गेल्यावर आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचे आहे आणि प्रत्येक मंत्र जप झाल्यानंतर माझे संकट दूर करा माझ्यावरील कर्ज मुक्त करा अशी प्रार्थना करायची आहे व ही प्रार्थना करत असताना रूमाला मधील जे साहित्य आहे ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे.
त्यानंतर सर्व साहित्य सामग्री आपल्याला नदीमध्ये विसर्जन करायची आहे असे आपल्याला सात सोमवार अवश्य करायचे आहे. जर तुमची मुले वारंवार आजारी पडत असतील, काही खाल्ले तरी उलटी करत असतील तर अशा वेळी एका पानावर बुंदीचा लाडू ठेवून व पाच गुलाबाचे पाने फुले घेऊन आपल्याला मुलाच्या अंगावरून सात वेळा उतरायचे आहे आणि हे साहित्य आपल्याला एखाद्या मंदिरात ठेवायचे आहे. असे केल्याने मुलांची तब्येत व्यवस्थित होईल त्यांना कोणत्या प्रकारचा आजार होणार नाही व त्यांना नजर लागली असेल ती नजर सुद्धा निघून जाईल.
जर नाही तुमच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत असतील तर अशा वेळी आपल्याला पाच गुलाबाची फुले घ्यायचे आहेत आणि बेलाची पाने घ्यायचे आहेत. ही बेलाची पान आपल्या ओंजळी मध्ये घेऊन आपल्या संकटे अडचणी आपल्याला म्हणायचे आहेत आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे असे आपल्याला पौर्णिमेला करायचे आहे, अशा पद्धतीने जर आपण पाच पौर्णिमेला हा उपाय केला तर आपल्या कामामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होऊन जाणार आहे आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.