घरात गरिबी येण्याची हि आहेत 9 लक्षणे; आत्ताच जाणून घ्या नाहीतर नंतर पच्छाताप करण्याची वेळ येईल.!

घरात गरिबी येण्याची हि आहेत 9 लक्षणे; आत्ताच जाणून घ्या नाहीतर नंतर पच्छाताप करण्याची वेळ येईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो, मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दारिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसे येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरी आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही या वेळी आपण चिंता व्यक्त करत असतो.अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो.

या सगळ्या गोष्टी मागे काही कारणं सुद्धा असतात, ती कारणे आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. घरात गरिबी आली की आपण अनेक वेगवेगळे उपाय करत असतो परंतु हे उपाय कोणत्या कारणामुळे आलेल्या आहेत ही समस्या मागील महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत याबद्दल आपण जाणून घेत नाही म्हणूनच आज तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, त्या माहितीचा द्वारे तुम्हाला तुमचे नेमके कारण करणार आहे या कारणद्वारे तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल.

तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विंचरू नये त्याचबरोबर उभे राहून केस विंचरू नये त्यामुळे घरामध्ये दारिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. घरात अस्वच्छता ठेवणे, घरामध्ये घाण साची देणे, या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दारिद्रता आपल्या घरात प्रवेश करते म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व शुद्ध असावे. कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी .काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरवात उजव्या बाजूनेच करावी.

दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दारिद्र्याचे लक्षण मानले जाते म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. काही व्यक्तींना दातांनी नखं खाण्याची सवय असते, ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दारिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे बरकत राहत नाही जर तुम्हाला सुद्धा दाताने वारंवार नखे कुरतडून खाण्याची सवय असेल तर ती आत्ताच थांबवा अन्यथा भविष्यात अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल.

जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्ती गरीब आहेत त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही अशा व्यक्तीने जर फाटलेले, तुटलेले , मळके कपडे घातले तर काही हरकत नाही कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही परंतु जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्यचे एक लक्षण आहे.

सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेलो असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती ,वैभव येत नाही त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मी चे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री उघडे अजिबात ठेवू नये.

हे सुद्धा दारिद्र येण्याची लक्षण मानले जाते म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे त्याचबरोबर आपल्या दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात.जर उलट्या चापप्त व बुट या वारंवार आपल्या दारासमोर असेल तर यामुळेसुद्धा गरिबी व अनेक अडचणी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून जर चपला-बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे.

मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात त्याच बरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे त्यांच्याशी कधीच वाद नाही करायला पाहिजे कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो.

भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांचा मानसन्मान अवश्य करा, त्यांना अपमानित करू नका. यामुळे सुद्धा तुमच्या घरी दारिद्रता प्रवेश करू शकते.

आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरणात राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी-देवता नेहमी वास्तव्य करत असतात म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *