सकाळी सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने काय घडते.? ९०% लोकांना माहित नाही याचे सत्य.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण प्राचीन काळापासून असे ऐकत आलो आहोत की सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम तुळशीच्या वृंदावनाला एक तांब्या पाणी अर्पण करायला हवे त्याप्रमाणे आपण असे करतो ही आपण सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करतो. धूप दीप लावतो ,अगरबत्ती करून पूजा करतो आणि हात जोडून नमस्कार करतो परंतु कधी आपल्याला असे वाटते इतर कोणत्याही झाडाझुडपांना एवढे महत्त्व नाही परंतु तुळशीला एवढे महत्त्व का आहे.? असा प्रश्न निर्माण होतो. तुळशीची नियमितपणे पूजा-अर्चना केली त्याचबरोबर तुळशीला नियमितपणे तुळशीला नियमितपणे जल अर्पण केल्यास काय घडते? याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
तुळशी बद्दल पुराण कथेमध्ये अनेक कथा आहेत. त्या कथांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर तुळशीला पाणी अर्पण का करावे ? याबद्दलची सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे त्याच पुराण कथेमध्ये एक कथा सांगितलेली आहे ती कथा म्हणजे जालिंदर हा एक शूर पराक्रमी राक्षस होता.
आपल्याशी व पराक्रमाच्या जोरावर त्यांनी देव साधू यांना नकोनकोसे करून सोडले होते. त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडला होता मग सर्व देवांनी श्रीहरी विष्णू यांना शरण जाऊन जालिंदर पासून सुटका कशी मिळवायची याकरिता विनवणी केली तेव्हा श्रीहरी विष्णू यांनी जालिंदर बद्दल माहिती काढली तेव्हा श्रीहरी यांना कळाले की जालिंदर यांची पत्नी वृंदा ही सती पवित्र आहे तिच्या पवित्र यामुळेच पती जालिंदर विजयी होत आहे जालिंदर ला रोखायचे असेल तर पत्नी वृंदा हिचे पावित्र्य भंग करणे हाच एक उपाय आहे.
हे करण्यास कोणीच पुढे येत नाही. शेवटी ही जबाबदारी सुद्धा श्री हरी स्वीकारतात आणि जालिंदर याचे रुप स्वीकारून श्रीहरी विष्णू वृंदेच्या महाली जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा आलिंगन देते तिच्या पतीव्रताचा व भंग होताच जालिंदर याचा मृत्यू होतो. देवाने मारलेल्या बाणामुळे जालिंदरराचे शिर तुटते आणि वृंदेच्या महाली पडते.
पतीचे शीेर पाहून वृंदा चकित होते आणि श्री हरि यांना विचारते की तू कोण आहेस तेव्हा श्रीहरी त्यांची मूळ रूप धारण करतात अशा वेळी संतप्त वृंदा श्रीहरी विष्णू यांना श्राप देते आणि म्हणते की तू दगड होऊन पडशील आणि ज्या प्रमाणे मला तुझ्यामुळे माझ्या पतीचा विरह सहन करावा लागत आहे त्याच पद्धतीने तुलासुद्धा तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल. तेव्हा भगवान वृंदा ची माफी मागतात आणि ते वृंदावन म्हणते की तू मला भ्रष्ट केले आहेस आता मला कोण स्वीकारेल.?
त्यावर श्रीहरी विष्णु असे म्हणतात की मी तुला स्वीकारेल आणि जे लोक तुझी पूजा करेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल त्यानंतर वृंदा सती जाते म्हणूनच पुढच्या ज्यांनी श्रीहरी विष्णू यांना राम अवतारांमध्ये पत्नी सीता यांचा विरह सहन करावा लागतो. देव दगड होऊन पडले त्याला शालिग्राम असे म्हणतात. ज्या ठिकाणी वृंदा चे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगवले. हीच ती तुळस वृंदाच्या नावाने लावली जाते तिच तुळस श्रीकृष्णाने पांडुरंगाने सुद्धा धारण केली आहे. श्रीहरी विष्णू यांनी तुळशीला स्विकारले म्हणून जो दगड शालिग्राम म्हणून ओळखला जातो त्या दगडा सोबत तुळशीचा विवाह रचला जातो.
ती भगवंतांचे प्रिय आहे म्हणूनच जे लोक तुळशीची पूजा करतात त्यांच्यावर श्रीहरी यांची कृपा असते. याच कारणामुळे त्तापर्यंत वारकर्यांनी आपल्या पुजा अडचणी मध्ये तुळशीला विशेष महत्त्व दिले आहे. हे झाले धार्मिक महत्त्व आता आपण वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया. प्रत्येक वनस्पती रात्री कार्बन डाय-ऑक्साइड व दिवसा ऑक्सिजन सोडत असते अपवाद फक्त पिंपळ कारण पिंपळ रात्रीसुद्धा ऑक्सीजन सोडत असते. त्याचबरोबर तुळशीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा विशेष महत्त्व दिले गेलेले आहेत. तुळशी मुळे सर्दी ,खोकला, कफ होत नाही त्याच बरोबर अनेक आजारांमध्ये सुद्धा तुळशी उपयुक्त ठरते. तुळशीमध्ये असणारे पोषक तत्वमुळे शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते म्हणून अनेक आजारांवर मात करण्यासाठी तुळशी उपयुक्त ठरते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.