दातांसाठी वरदान आहे हा उपाय; दातदुखी, कीड, हिरड्यातील सूज मिनिटांतच होईल बंद.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दात दुखत असेल, दाताला कीड लागलेली असेल, दातातून रक्त येणे, दाता मधून पू येणे किंवा हिरड्या ला सूज असेल या सर्व समस्या पासून कायमची सुटका होणार आहे. दात दुखी ची व्यथा कोणत्याही टप्प्या वरुन सुरुवात होते. दात दुखायला लागला की डोळ्यांसमोर तारे चमकायला लागतात. डोक्याच्या नस पर्यंत त्याची ठणक बसते. डोके सुद्धा दुखायला लागते.
जबडा सुद्धा हालवता येत नाही मग आपण पेनकिलरच्या गोळ्या आणून ठेवतो. दात दुखायला लागले, हिरडी दुखायला लागली की मग पेन किलर चा सपाटा चालू होतो. या एका पाण्याने गुळण्या करा ,दात दुखणे बंद होतील. दात दगडासारखे बनतील. हिरड्या मजबूत होतील. दात सुद्धा हलणार नाही. हा उपाय नक्की करून बघा.
दातासाठी दवाखाना मध्ये पाऊल ठेवणार नाही असा उपाय आहे हा.. याशिवाय दातांचा पिवळेपणा चा रंग देखील बदलून पांढरेशुभ्र रंग होण्यास मदत होते. हा उपाय कसा करायचा आहे? या उपाय साठी काय काय लागणार आहे? हा उपाय कधी करायचा आहे ते आता आपण जाणणार आहोत. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बाभळीची साल.
बाभळीच्या साली अनेक पोषण तत्त्वांनी उपयुक्त असते त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयन परिपुर्ण असते. दाताच्या समस्या साठी बाभळीच्या झाडाची सालीचा वापर करावा त्याचप्रमाणे एक ग्लास पाणी उकळत ठेवायचे आहे त्यानंतर बाभळीची साल घ्यायची आहे. बाहेरची साल घ्यायची नाही, आतली साल घेऊन त्या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे. ते पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे.
उकळत असताना पाण्याचा रंग बदलत असतो,ज्या सालीचा रंग आहे तो रंग पाण्याला चढत जातो. अर्धा पर्यंत पाणी आलं की त्याच्या मध्ये आपल्याला सैंधव मीठ टाकायचा आहे. सैंधव मीठ म्हणजे आपण जे उपवासाला वापरतो ते मीठ . दात मजबूत होण्यासाठी सैंधव मीठ उपयुक्त आहे. मीठ टाकल्यानंतर ते परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचा आहे.
अर्धा पर्यंत ते पाणी आले तर गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे मिश्रण थंड करून गाळणी च्या साह्याने गाळून घ्यायचा आहे. सकाळी आपल्याला चांगल्या पद्धतीने दोन वेळा गुळणी करायचे आहेत. संध्याकाळी सुद्धा आपल्याला जेवणानंतर झोपण्याच्या अगोदर गुळणी करायची आहेत असे केल्याने तुमचा दाताचे आरोग्य आहे ते खूप उपयुक्त राहील. असा हा उपाय आहे याच्यामुळे दात दुखणार नाही. दाताची ठणक आहे ती बंद होणार आहे. दातातून रक्त येणे बंद होईल, हिरडी सुजनार नाही, हिरड्यातून पू येत असेल लगेच बंद होईल अतिशय उपयुक्त हा उपाय आहे. हा उपाय अवश्य करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.