तुम्हीपण खूप जास्त प्रमाणात चहा पित आहात..? तर हि माहिती एकदा नक्की वाचा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला आपण जर जास्त चहा पित असाल म्हणजे दिवसातून ४ ते ८ वेळा चहा पित असाल तर त्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात हे आम्ही सांगणार आहोत.
चहा सोबत आपण काही पदार्थ खातो त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला मारक बनतो. आणि बरेच रोग सुद्धा आपल्याला त्यामधून होऊ शकतात. नेहमी चहा पिल्याने हाडे ठिसूळ होऊन जातात म्हणजे मजबूत राहत नाही. रक्तदाब वाढतो आणि आम्ल पित्ताचा सुद्धा आपल्याला त्रास होतो.
आपण म्हणतच असतो कि जास्त चहा पिल्याने ऍसिडिटी वाढते वगैरे. चहा चवीला तुरट असल्याने बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना तर चहा न पिल्याने तर त्यांना सौचास जावेसे वाटत नाही. हे सगळं सवयीनमुळे आहे, सौचाचा निर्माण करणे हे चहाचे काम नाही. चहा हा रक्ताची आम्लता वाढवतो म्हणून हा गैरसमज दूर करा.
बाहेरच्या ठिकाणी जर आपण अल्युमिनियम च्या भांड्यात उकळलेला चहा पिट असाल तर अल्युमिनियम चा खाद्यपदार्थांना स्पर्श झाल्यामुळे दीर्घकाळ संपर्क, अल्झायमर, स्मृती नाश असे विकार सुद्धा आपल्याला होऊ शकतात. म्हणून टपरीवरील अल्युमिनियम च्या भांड्यात जर कोण चहा पित असेल तर तो पिणे टाळावे.
दूध साखर आणि चहाची भुकटी आहे किंवा चहापत्ती एकत्र करून चहा पीत असाल तर कफ, पित्त, वात यांसारखे आजार वाळून उष्णगुन्हाचा तो असतो. दूध न टाकलेला चहा पिणेच खूप चांगलं आहे. दूध आणि साखर विना चहा आपण जर पुष्कळ पीत असाल तर त्याची चव तुरट लागते त्या अतिरिक्त तुरट चवीमुळे रक्तदाब,आणि पक्षघात यांसारखे विकार आणि शुक्राणूंची जी संख्या आहे अल्प होण्याचा आजार आपल्याला होऊ शकतो. म्हणून यापासून थोडं लांबच राहा.
आपण बघतो कि भारतीयांमध्ये चहा पिण्याचे प्रमाण जगामध्ये सर्वात जास्त आहे. बिअर नंतर जगामध्ये काही पिलं जात असेल तर तो चहा आहे. त्यामुळे बसून काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना मधुमेह होऊ शकतो, जास्त चहा जर पित असतील तर कोलेस्ट्रॉल चे प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये वाढून जाते आणि हृदयविकार यांसारखे आजार ते स्वतः ओढून घेतात. म्हणून चहा कमी पिया, लिमिट मध्ये पिया.
अनेकांना तर चहा म्हणजे अमृत वाटते, चहा घेतल्याशिवाय तर काहींना करमत नाही. पुष्कळ तज्ज्ञांच्या मतानुसार आपण चहा दिवसातून २ ते ३ कप घायचा, आणि तो हि जर टाळला जात असेल तर उत्तमचं. त्यामुळे तुमच्या शरीरावर चहाचा कुठलाही इफेक्ट होणार नाही आणि आणि तुमचं शरीर सुरक्षित राहू शकेल.
दिवसाला ४ ते ८ कप इतका लोकं चहा पितात, अति उकळलेला तो चहा पिऊन पचनशक्ती बिघडून जाते, आम्लपित्त वाढते, अल्सर चे प्रमाण वाढत आहे, सांधेदुखी वाढत आहे. अशा अनेक विकारांना आपण बळी पडतो. चहा काही अमृत नाहीय त्यामुळे चहा पिताना थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवसातून १-२ कप चहा पिला तरी भागून जाईल.
हे शरीर फार लाखमोलाचं आहे आणि चहा फक्त ५ रुपयाचा.!
म्हणून थोडस सावध होऊन चहा पिला पाहिजे. कमीतकमी चहा पिण्याचं प्रमाण आपलं असलं पाहिजे. कोणतेच डॉक्टर तुम्हाला म्हणणार नाहीत कि तुला हा आजार झाला आहे तर तू चहा पी किंवा चहाचं प्रमाण वाढव. चहा हा घातकच आहे. ब्रिटिश काळामध्ये पाहिलं तर जेव्हा साखरेचं प्रमाण कमी झालं होत त्या काळामध्ये लोकांनी पेपरमिंट च्या ज्या गोळ्या आहेत त्या चहामध्ये टाकून तोही चहा म्हणून पिताना दिसलेला आहे. एवढे त्या चहाच्या आहारी भारतीय लोकं गेले होते.
आणि आजही आपण पाहतो कि लोकं अक्षरशः चहा मिळाला नाही तर डोकं चालत नाही असं म्हणतात. बरेचदा आपण पाहतो फक्त दुधाचा चहा करतात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे पित्त वाढून डोकेदुखी वाढते, अपचन आहे, मळमळ , पोटफुगी, असे वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणून यापासून थोडं लांब राहा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.