छत्रीवाली बद्दल जाणून घ्या बरेच काही.!
Star Pravah वरील छत्रीवाली या मालिकेतील अभिनेत्री नम्रता प्रधान मधुराची भूमिका साकारत आहे. नम्रताचा जन्म २१ सप्टेंबर १९९३ मध्ये मुंबईत झाला. नम्रताला एक भाऊ आणि एक बहीण आहे. भावाचं नाव अमेय आणि बहिणीचं नाव गुंजन असं आहे. नम्रताच शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण हे मुंबई मधेच झालं आहे. त्यांनतर तिने फॅशन डिसाईन आणि मॉडेलिंग चा देखील कोर्स केला आहे. नम्रताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे शाळेतील कार्यक्रमांमध्ये ती नेहमी भाग घ्यायची तसतशी अभिनयाची आवड खूपच वाढत गेली आणि तिने अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं.
twipu.com
फॅशन डिसाईन आणि मॉडेलिंग मध्ये कोर्स पूर्ण झाल्यांनतर नम्रताने आपले फोटो , पोर्ट फोलिओ इंडस्ट्रीत पाठवायला सुरवात केली. त्या नंतर तिला Star Pravah या चॅनेल वरील छत्रीवाली या मालिकेसाठी ऑडिशन ची संधी मिळाली. तिने या मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि तिचे या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवडही झाली. २०१८ या साली तिने छत्रीवाली या मालिकेतून अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलं. या मालिकेत तिने मधुरा नावाची प्रमुख भूमिका साकारली आहे. आणि तिच्यासोबत संदीप पाठक हा देखील प्रमुख भूमिका साकारत आहे.
या मालिकेत काम करताना नम्रताला काही गोष्टींचा संघर्ष देखील करावा लागला. ती कल्याण ला राहत असल्यामुळे आणि मालिकेचा सेट मढ ला असायचं. त्यामुळे तिची खूप धावपळ व्हायची म्हणून ती कुटुंबाला सोडून मढ ला राहायला आली. रिक्षाने प्रवास करून ती शूटिंग ला पोहोचायची परंतु तिची हीच मेहनत तिच्या कामास आली. छत्रीवाली मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि याच मालिकेमुळे ती प्रसिद्धीस आली. या मालिकेनंतर ती खूप लोकप्रिय झाली. नम्रता प्रधान ने Mrs Deshmukh या मराठी चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपट युवासंस्थेवर आधारित होता. त्याचप्रमाणे नम्रताचे TikTok वरील विडिओ देखील खूप व्हायरल होतात. TikTok च्या माध्यमाने ती प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.
तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना देखील शेअर करा.