डोळ्यात कचरा गेला असेल तर हे उपाय नक्की करा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपल्या डोळ्यांमध्ये कचरा गेला तर कोणते उपाय आपण करायला हवेत हे आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. डोळे हे मानवी शरीरातील महत्वाचे ज्ञानेंद्रिये आहेत. डोळे हा अतिशय महत्वाचा आणि नाजूक अवयव असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते. ढगळ,माती, असेल यांच्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते.
वातावरणातील धुळीकण डोळ्यात गेल्यामुळे डोळ्याची जळजळ होऊ शकते. डोळ्यातून पाणी येणे,खुपणे असे अनेक त्रास संभवतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा प्रवासातून डोळ्यामध्ये माती किंवा कचरा जातो. अथक प्रयत्न करूनही डोळ्यातील कचरा काढणे शक्य होत नाही अश्यावेळी काही सोप्प्या पद्धतीने आपण डोळ्यात गेलेला कचरा काढू शकतो.
पहिला उपाय म्हणजे सुती कापड पाण्यात भिजवावे. या ओल्या कपड्याने डोळ्याच्या कडा हल्या दाबाव्यात. हा दाब देताना डोळ्याच्या कोणत्याही जागेवर जोर पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.
दुसरा उपाय म्हणजे डोळ्यावर गार पाणी शिंपडावे किंवा एका बशीत पाणी घेऊन एक दोन सेकंड त्यात डोळा उघडझाप करावा. हे करत असताना डोळ्यात पाणी जात मात्र घाबरू नये. यामुळे डोळ्यातील बरीचशी घाण निघून जाते.
अनेकवेळा पापण्यांवर धूळ साचते. अश्यावेळी डोळ्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या ज्या पापण्या आहेत त्या खालच्या पापण्यांवर ठेवाव्यात आणि डोळ्यांची हळूहळू उघडझाप करावी.
चौथा उपाय हा कि डोळ्यामध्ये धूळ गेल्यास डोळ्यांमध्ये हळुवार फुंकर मारावी. यामुळे बारीक धूळ निघून जाण्यास मदत होते.
पाचवा उपाय म्हणजे डोळ्यांमध्ये काही गेल्यावर त्याच क्षणी डोळ्यांची उघडझाप करावी. जेवढ्या लवकर तुम्ही हि कृती कराल तेवढा डोळ्यातील कचरा दूर होण्याची शक्यता जास्त असते.
अशाप्रकारे मित्रांनो जर आपल्या डोळ्यांमध्ये धूळ गेली असेल, कचरा गेला असेल तर आपण हे उपाय जरूर करून पाहावेत आपल्याला त्याचा फायदा जरूर मिळेल. आणि हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.