11 दिवस काय पाठ केल्याने आपण मागितलेले आपल्याला हवे ते मिळेल.
नमस्कार मित्रांनो,
हनुमान चालीसाचा 11 दिवस पाठ केल्याने आपल्या मनातील कोणतीही इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होते. मग हा पाठ कसा करायचा आहे? कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे चला जाणून घेऊया.
हनुमान चालीसाचा अकरा दिवसांचा हा पाठ तुम्ही घरातही करू शकता किंवा आपण रहात असलेल्या परिसरात एखादा हनुमानाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन केल्यास अतिउत्तम. मात्र आपल्या घरात केले तरी सोयीस्करच ठरते. अनेकांच्या मनात प्रश्न असेल तर हा उपाय महिला करू शकतात का? अगदी मनात कोणतीही शंका कुशंका न आणता महिलासुद्धा हा उपाय करू शकतात.
केवळ एका गोष्टीचे स्मरण ठेवायचा आहे की, हनुमानाला शेंदूर आपण लावायचा नाही आणि लाल वस्त्र अर्पण करायचं नाही. हे पाठ करताना व्रत किंवा उपवास करण्याची सुद्धा गरज भासत नाही. नित्यनेमाने हनुमान चालीसाचा पाठ करायच आहे.
त्यासाठी आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे, ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व या दरम्यान ची जागा. या दिशेला जरी आपले देवघर नसले तरी सुद्धा तो कोपरा स्वच्छ करायचा आहे. नंतर तिथे पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून हनुमानाची मूर्ती किंवा एखादा फोटो ठेवायचा आहे.
या मूर्तीजवळ प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांची ही मूर्ती किंवा फोटो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. या पाठाची सुरुवात मंगळवारी केल्यास अतिउत्तम. पण आठवड्याच्या कोणताही वारी सुरुवात तुम्ही करू शकता. पण मंगळवार हा शुभ मानला जातो किंवा शनिवारी देखील करू शकता.
तुमच्या जीवनामध्ये अगदी कोणत्याही प्रकारची संकटे, दुःख, किंवा समस्या असू द्या हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अडीअडचणी नक्कीच दूर होतील. शनीची साडेसाती महादशा या सर्वांचे निवारण करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे.
अशाप्रकारे हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहे त्या वस्तू अर्पण करायचे आहे. लाल फुले, दोन शाबूत लवंगा आणि नैवेद्य म्हणून गुळ फुटाणे किंवा भाजलेले हरभरे आणि गूळ तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचा आहे.
त्या पाण्यामध्ये एक नाणं टाकायचा आहे आणि त्या नाण्याबरोबर लवंग अशी लवंग जिला फुल आहे, जी फुटलेली, तुटलेली नाही अशी लवंग तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवायच आहे. त्यानंतर हनुमान चालीसा चा पाठ करण्यास आपण सुरुवात करू शकता. रोज निश्चित एक वेळ ठरवा आणि त्या वेळेला हा पाठ केला जावा.
तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय काय करू शकता वेळ मात्र निश्चित ठरवा. सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ तुम्ही निश्चित करू शकता. सलग अकरा दिवस हा पाठ करावा. हा उपाय करण्याआधी स्वच्छ स्नान करावे आणि शक्यतो लाल रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकता.
हनुमान चालीसा चा सलग तीन वेळा पाठ आपण करायचा आहे. जर तुमची इच्छा असेल तर हनुमानाचा एखाद्या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता. अशाप्रकारे नित्यनियमाने अकरा दिवस हा हनुमान चालीसाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर कलशामध्ये जे नाणं आणि लवंग टाकलेली आहे ती बाहेर काढायचे आहे.
तसेच हे नाणं आणि लवंग कायम आपल्याजवळ ठेवायचे आहे.
जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी जाल तेव्हा या दोन गोष्टी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पाकीटामध्ये ठेवा. हा उपाय सलग 11 दिवस तुम्हाला करायचं आहे.
हा उपाय केल्यानंतर दर मंगळवारी आणि दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांच दर्शन घ्यायला विसरू नका. कारण हनुमानांच्या कृपेने तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ते पूर्ण होणार आहे. तुमच्या संकटांचे निवारण होणार आहे.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.