झोप येत नाही ! हा घरगुती सोपा उपाय करून पहा. शांत झोप लागेल.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो चांगलं आरोग्य हे 80 टक्के तुमच्या झोपेवर अवलंबून असते. तुम्हाला पुरेशी झोप होत नसेल किंवा रात्री तुम्ही जागरण करत असाल किंवा अनेकांना झोप न येण्याचा प्रॉब्लेम आहे. मग अशामध्ये तुमचा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोप तुम्ही व्यवस्थित घेतली नाही तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे बिघाड निर्माण होतात आणि आपलं आरोग्य बिघडतं.
आणि यासाठीच वेळेवर झोपले पाहिजे. अनेकांना हल्ली आपण बघतो की, मोबाईल जास्त वेळ पहात राहणे किंवा जास्त वेळ टीव्ही पाहणे. यामुळे नंतर उशिरापर्यंत झोप येत नाही प्रत्येकाची झोपेची ठरलेली वेळ असते. ही वेळ तुम्ही टळून जर दिली तर मग मात्र तुम्हाला झोप येत नाही.
म्हणून एक नक्की सांगेन मित्रांनो तुमची झोपेची वेळ ओळखा आणि त्यावेळेस शक्यता झोपायचा प्रयत्न करा. परंतु तरीही झोप येत नसेल तर आजच्या या माहितीमध्ये आपण पाच ते सहा असे उपाय बघणार आहोत आ यु र्वे दि क आणि घरगुती की, त्याच्यामुळे तुम्हाला सहज झोप येणार आहे. चला तर मग बघुया झोपेसाठी उपाय आयुर्वेदामध्ये आहेत.
पहिला उपाय झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध घेतल्याने शांत झोप लागते. दुधामधील अमिनो ऍसिडमुळे झोप शांत लागण्यासाठी मदत होते. दिवसभरात दह्याच जर सेवन तुम्ही करत असाल तरी देखील तुम्हाला शांत झोप लागते. झोपण्याआधी दुध किंवा पाण्यात चिमूटभर जायफळाची पावडर घेतल्यास चांगला परिणाम होतो. आपल्याला माहीत असेल जायफळ हे लहान मुलांना जर ताप आला तर दिलं जातं.
परंतु झोप जर तुम्हाला येत नसेल तर दुधामध्ये तुम्ही चिमूटभर जायफळ जे आहे ते उकळून घ्या आणि गरम दुधामध्ये घोट घोट घ्या त्यानेसुद्धा झोप चांगली लागते. झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस खडीसाखर आणि मध एकत्र करून तुम्ही जर त्याच सेवन जर केलं तर त्याने देखील तुम्हाला चांगली झोप लागत असते.
रात्रीच्या जेवणामध्ये कच्चा कांदा असल्यास झोपेमध्ये व्यत्यय येत नाही. लक्षात ठेवा जे लोक कच्चा कांदा रात्रीच्या जेवणात घेतात त्यांना रात्रीची झोप मोड होत नाही त्यांना शांत चांगली झोप लागते. झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीचे आणि पुदिन्याची पानं टाकून जर आपण आंघोळ केली तर आपली झोप सुखकर होत असते.
आणि ज्या व्यक्तींना शक्यतो झोप लागत नाही त्यांनी रात्री अगदी झोपण्याच्या अगोदर आंघोळ केली तर त्यांना देखील त्याचा चांगला फायदा होतो. अजून सांगायचं झालं तर झोप न येण्याचं कारण म्हणजे आपण काहीच काम करत नाही. दिवसभर तुम्ही बसून असाल किंवा दुपारची तुम्ही झोप घेत असाल तर रात्री तुम्हाला झोप येत नाही.
शारीरिक कष्ट जर तुमचे कमी असतील आणि मानसिक तुम्ही जास्त विचार करत असाल तर तरी देखील तुम्हाला झोप येत नाही. म्हणून नक्कीच सांगेन की, शारीरिक कष्ट हवं दिवसातून 45 मिनिटे फास्ट चालणं, पळणं, धावणं किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, योगा करा, प्राणायाम करा याने तुमचं मन एकाग्र राहत, चित्त एकाग्र आणि तुम्ही शांत झोप तुम्हाला येऊ शकते. तेव्हा हे उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.