या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली असतात साक्षात लक्ष्मी
नमस्कार मित्रांनो,
ज्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह आणि चैतन्याने भरून जाते. तिच्या पावलांची छुनछुन, तिचं नटन आणि घरभर तिचं बागडणं एका क्षणात तिच्या जन्माबरोबर आपल्या डोळ्यापुढे येत. मुलगी मुळातच असते लक्ष्मीचे रूप. ज्या घरात जन्म घेते त्या घराची भरभराट आणि आनंद ती द्विगुणीत करते.
तुम्ही पहा ज्या घरात मुली नाहीत ते अगदी शांत आणि निर्जीव दिसत. तशा तर प्रत्येकच मुली लक्ष्मीच्या पावलांनी घरात येतात. पण काही विशिष्ट महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुली त्या खूपच नशीबवान व भाग्यवान मानल्या जातात. फक्त माहेरीच नाहीतर सासरीदेखील अशा मुलींच्या आगमनाने सुख समृद्धी ऐश्वर्य येतील. त्या घराची भरभराट होते.
घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या आपलंसं करतात. त्या ज्या कोणाच्या सहवासात राहता त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात ते एक वेगळे प्रकारेच स्थान निर्माण करतात. फेब्रुवारी महिन्यात जन्मणाऱ्या मुली या खूपच लकी मानल्या जातात. यांचा स्वभाव शांत संयमी आणि धैर्यशील असतो.
कोणत्याही अडचणींना अशा मुली धैर्याने सामोऱ्या जातात. माहेरी या जेवढ्या लाडक्या असतात तशाच त्या सासरी देखील राणीसारखे राहतात. म्हणजेच सासरी देखील या फेब्रुवारीमध्ये जन्मणाऱ्या मुलींना सन्मानाने आणि आदराने वागवलं जात. त्यांचे प्रत्येक हट्ट हे पुरवले जातात. तसेच एप्रिल महिना हा शास्त्रानुसार खूपच शुभ मानण्यात आलेला आहे.
त्यामुळे या महिन्यात जन्मणाऱ्या मुली या साक्षात देवीच रूप मानल्या जातात. अशा मुली ज्या घरात जन्म घेतात त्या घराच्या त्या आनंदवन करून जातात. सुख समृद्धी ऐश्वर्य यांच्या पावलांनी त्या घरात येतात. एप्रिल महिन्यात जन्मणाऱ्या मुलींचे ग्रह हे खूपच चांगले असतात. म्हणूनच ज्यांच्याशी या मुलीचा विवाह होतो ते घर धनधान्याने भरून जातील.
जोडीदारालाही अशा मुलीच्या आयुष्यात येण्याने प्रत्येक कार्यात यश मिळते, किर्ती मिळते आणि तो सर्व गोष्टींमध्ये संपन्न होतो. अचानक खूप सारा धन लाभ व्हावा अशा प्रकारची एन्ट्री या मुली आयुष्यात आल्याने होते. जून महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली या साक्षात लक्ष्मीच स्वरूप मानल्या जातात. अशा मुली खूपच धीराच्या आणि धैर्यशील असतात.
नशिबाबरोबरच ग्रहांची अनुकूलता देखील लाभलेली असते. म्हणूनच ज्या घरात या जातात तिथे पैशांचा अगदी पाऊस पडतो. साक्षात लक्ष्मी त्या घरात खेळत राहते. परंतु अशा मुलींचा स्वभाव हा थोडासा कठोर मानला जातो. आपले ध्येय, उद्देश गाठण्यासाठी किंवा साधण्यासाठी त्या नेहमीच तत्पर राहतात.
सप्टेंबर महिन्यात जन्मणाऱ्या मुली या खूप धनवान मानल्या जातात. कारण यांच्या कुंडलीत चंद्र, बुध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन झालेली असते या मुलींना स्वतःहून जास्त करावं लागतं नाही. यांचे ग्रहमान अनुकुल असल्याकारणाने त्यांचा विवाह हा श्रीमंत घरामध्ये होतो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.