या 4 राशींचे मित्र म्हणजे अगदी सुदामासाठी कृष्ण

नमस्कार मित्रांनो,
मित्रानो आपण सहजच असं म्हणतो कि मैत्री असावी तर कृष्ण आणि सुदामा सारखी. प्रत्येकालाच अशी मैत्री हवी हवीशी वाटते. आपल्या हृदयात अश्रू आल्या नंतर मित्राच्या हृदयात कळ उठेल असा एकतरी मित्र आपल्याही आयुष्यात असावा असं प्रत्येकाला वाटत.
तुम्हाला देखील असा विचार कधी ना कधी आलाच असेल. मित्रानो अशा काही राशी आहेत ज्या अगदी कृष्ण आणि सुदामा सारख्या आहेत. कारण त्यांची मैत्री हि कृष्ण आणि सुदामासारखी असते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.
1) मेष राशी – मित्रानो मेष राशीच्या जातकांना मैत्रीची चांगली जाण असते. यांच वैशिष्ट्य म्हणजे यांनी जर का एकदा तुम्हाला मित्र मानलं कि मग ते मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाहीत. परंतु या राशीचे लोक थोड्या फार प्रमाणात रागीट असतात हे मात्र खरं.
मित्रानो हे जरी खरं असलं तरी त्यांच्या मनात काही नसत. म्हणजेच जे मनात आहे तेच त्यांच्या तोंडी असत. ओठी एक पोटी एक असा प्रकार यांच्यात नसतो. त्यामुळेच लोकांना यांचं स्पष्ट बोलणं आवडत. म्हणून यांची मैत्री पारदर्शक असते. मैत्रीत कुठलाही स्वार्थ हे लोक ठेवत नाहीत.
2) मिथुन राशी – या राशीचे लोक स्थिर असतात आणि जीवनाचा आनंद घेतात . मिथुन राशीचे लोक मैत्रीत पक्के असतात. तसेच ते मित्रांना प्रत्येक अडी अडचणीत साथ देतात. ज्या लोकांचे हे मित्र आहेत त्या लोकांना त्यांच्या सहवासात नेहमी मजा येते कारण यांचा स्वभाव प्रचंड विनोदी असतो.
त्यामुळे मैफिल जमवणं यांना चांगलं जमत. तसेच हे लोक मैत्रीसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. मिथुन राशीचे लोक त्यांच्या लाईफ पार्टनरला सुद्धा साथ देतात. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्यामुळे त्यांना हे गुण मिळतात.
3) मकर राशी – या राशीचे लोक कष्टाळू , मेहनती , प्रामाणिक असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या राशीच्या लोकांना जास्त मित्र नसतात. परंतु जेवढी मित्र आहेत ती यांची जिवलग मित्र असतात. मित्रांच्या बाबतीत हे लोक सिलेक्टिव्ह असतात असं म्हणायला हरकत नाही.
दोनच मित्र असतील पण पक्के असतील. कधीही वेळेला हाक मारली तर येऊन उभे राहतात. हे लोक सुद्धा एक हाकेला जाऊन उभे राहतील अशी यांची मैत्री असते. नात्यांच्या बाबतीत मकर राशीचे लोक प्रामाणिक असतात.
मकर राशीचे लोक नेहमीच दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात. म्हणजे जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा हे लोक तुम्हाला तिथे उभे दिसतील. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि म्हणूनच या लोकांवर शनिदेवाच्या गुणांचा प्रभाव आहे.
4) मीन राशी – मित्रानो मीन राशीचे लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात. त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा कपट नसतो आणि त्यामुळेच त्यांची मैत्री सुद्धा पक्की असते. एकदा का एखाद्याला त्यांनी आपलं मानलं कि मग ते पुढचा मागचा विचार न करता त्या व्यक्तीसाठी खस्ता खायला देखील तयार असतात.
स्वतःच मैत्री मध्ये कितीही नुकसान झालं तरी जास्त विचार करत नाहीत मित्राच्या मदतीला हे लोक लगेच उभे राहतात. जर तुमच्या मित्रांपैकी कोणी जर मीन राशीचे असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला हवं. प्रत्येकाला मीन राशीचा एकतरी मित्र असायलाच हवा. तर मित्रानो तुमच्या मित्रांबद्दल राशीनुसार तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला नक्की कळवा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.