वृषभ राशीच्या माणसांचा स्वभाव कसा असतो नक्की पहा.
नमस्कार मित्रांनो,
आज आपण वृषभ राशीचे माणसं कशी असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांना कोणत्या गोष्टीची आवड असते हे पाहणार आहोत. मित्रांनो वृषभ रास ही शांत स्वभावाची रास आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे माणसं शांत असतात. या राशीच्या लोकांचा चेहरा गोल असतो.
त्यांची बोलण्याची हातोटी अतिशय सुंदर आणि मधुर गोडवाणी असते. बोलताना ते अतिशय छान बोलतात. या राशीच्या लोकांना संततीविषयी संतुष्टता असते. या राशीच्या लोकांना गळ्याचा रोग होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि पोटाचा रोग होण्याची सुद्धा जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते.
पण ही माणसं मात्र स्त्री अधिन असतात. कान किंवा मानेच्या विकाराने या राशींचे लोकं त्रस्त असतात. आणि यामुळे त्यांचा मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता जरा जास्त असते. या राशीच्या लोकांना व्यापार करण्यासाठी प्रवास मोठ्या प्रमाणात करावा लागण्याची शक्यता असते.
आणि व्यवसायामध्ये त्यांना नफा सुद्धा भरपूर होणार असतो. या राशीच्या लोकांनी कुठलेही महत्वाचं काम करायचं असेल तर शक्यतो शुक्रवारी ते महत्त्वाचं काम करावं ते काम आपलं सफल होईल. त्याच पद्धतीने या राशीच्या लोकांना वीस वर्षांपर्यंत पाण्यापासून धोका असतो. पाण्यापासून सावध राहावं.
या राशीच्या लोकांना वयाच्या पहिल्या वर्षी, सोळाव्या वर्षी आणि तिसाव्या वर्षी गंडांतर येण्याची शक्यता असते. आणि वृषभ राशीची माणसं या गंडांतरातून जर वाचले तर ती माणसं वयाच्या 75 वर्षापर्यंत जगतील. या राशीच्या लोकांना मार्गशीष महिना जड जाईल. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काम न होणे, त्रास होणे,
मनस्ताप होणे अशांत वाटणे यासारख्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. मराठी महिन्यात मार्गशीष महिना असे म्हंटला जातो आणि इंग्लिश महिन्यानुसार डिसेंबर महिना या राशीच्या लोकांनी पंचमी, दशमी आणि पौर्णिमा या तिथीवर कुठलेही महत्त्वाचं काम करू नये. ते सफल होणार नाही आणि या राशीच्या लोकांनी शनिवारी महत्त्वाचं काम कधीही करू नये.
कारण या राशिच्या लोकांचा घातवार शनिवार आहे. पण वृषभ राशीचे माणसं मात्र सदन असतील, जवळ पैसा भरपूर राहील आणि यांचा पैसा धार्मिक कार्यात खर्च होईल आणि आत्यंतिक त्यांना मुक्ती मिळेल तर होती वृषभ राशीविषयीची माहिती.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.