वाटेत अंत्ययात्रा दिसल्यास ही चूक करू नका बरबाद व्हाल
नमस्कार मित्रांनो,
आपण एखादे शुभ कार्य करण्यासाठी बाहेर जाणार असाल मग ते कोणतंही असेल जस की, लग्न जमवण्यासाठी किंवा एखाद्याच्या बारशासाठी किंवा एखाद्या ओटी भरणाच्या कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यात मध्येच तुम्हाला एखादी अंतयात्रा जाताना दिसली,
तर आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकते. आपण ज्या कामासाठी चाललो आहोत त्यात काही विघ्न तर येणार नाही ना अशी शंका बऱ्याच जणांना ही अंत्ययात्रा समोरून आल्याने वाटते. मनात एक प्रकारची भीती आणि तणाव आपल्याला वाटतो.
बरेचजण तर या दिवसाचा कार्यक्रम रद्द करून दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठरवतात किंवा कार्यक्रमाला जाणेच टाळतात. खरच अशी अंतयात्रा आपल्या समोरून गेल्याने शुभ कार्यात विघ्न येतात का? किंवा अंतयात्रा दिसताच हाती घेतलेली कामे पूर्ण होत नाहीत का ? मित्रांनो असं अजिबात नाहीये.
जन्म किंवा मृत्यू हे सर्व त्या विधात्याच्या हातामध्ये आहे. कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आपल्या कोणत्याही कार्यात कोणताही बदल होत नाही. यामध्ये शुभ अशुभ असं काहीही नसत. फक्त आपल्याला जर अशा अंतयात्रेस सामोरे जावं लागलं तर फक्त एक गोष्ट करायची आहे.
आपण एक मिनिट बाजूला शांत उभे राहून त्या अंत्ययात्रेला पुढे जाऊ द्यायचं आहे. यात अशुभ मानण्यांसारखं काहीच नाही. आणि जर तुम्ही गाडीमध्ये बसलेले असाल तर फक्त अशा वेळी आपल्या देवतांच स्मरण या वेळी करायचं आहे.
हा एक शिष्टाचार आहे. जाणाऱ्या माणसाला एक प्रकारचा आदर, सन्मान म्हणून आपण अशी अंतयात्रा समोरून जात असेल तर थोडा वेळ कडेला शांत उभं राहायचं आहे. त्यांना अगोदर जाऊ द्यायचं आहे.
आणि त्यानंतर आपण ज्या कार्यासाठी किंवा कामासाठी जात आहोत त्यासाठी आपण निघायचं आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून किंवा गाडीत असाल तर गाडीमधून देवांचे स्मरण करत ‘हे परमेश्वरा मृतात्म्यास शांती लाभो’ अशी प्रार्थना करायची आहे.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.