वास्तुशास्त्रानुसार या 2 मूर्ती देवघरात एकत्र ठेवल्याने राजयोग बनतो.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपले दुःख त्रास दूर व्हावेत, आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी आपल्या घरात कायम सुख व समृद्धी रहावी यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांची आराधना करतो. आपण देवघरात यांची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजन करतो. प्रत्येकाच्या देवघरात वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो असतात.
परंतु जर आपल्या देवघरात या 2 मूर्ती ठेवल्या असतील तर राजयोग जुळून येतो. आपल्या घरात सुख, समृद्धी व संपदा येथे.
आपल्या सर्व इच्छा व मनोकामना यांची पूर्तता होते. आपली श्रद्धा भावना ज्या देवी देवतांवर असते, जे आपले इष्ट देव असतात ज्यांच्या मूर्ती किंवा फोटोचे रूपात आपण त्यांची देवघराची स्थापना करतो.
त्या देवी देवतांच्या मूर्त्यांबरोबरच या 2 मुर्त्या जर आपण देवघरात ठेवल्या तर आपले भाग्य उजळून निघेल. जर आपल्या घरात श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासोबत राधा राणीचा फोटो किंवा मूर्ती जरुरत ठेवावी. श्रीहरी कृष्ण व राधा राणी हे प्रेमाचे प्रतीक आहेत.
ज्यांच्या घरी श्री हरिकृष्ण व राधा राणी यांचा फोटो किंवा मूर्ती असते. अशा घरांमध्ये सुख-समृद्धी आनंद उत्साह कायम राहतो. अशा घरात कधीही भांडण तंटे व वादविवाद होत नाहीत. पती-पत्नीचे प्रेम वाढीस लागते व घरातील सदस्यांमध्ये देखील एकमेकांचे संबंध मधुर होतात. तसेच घरातील धन धान्यात वृद्धी होत असते.
बहुतेक घरांमध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते. आणि देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. आपल्याला वाटते की, देवी लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवावी. परंतु पूजा घरात देवी लक्ष्मीबरोबर श्रीहरी विष्णू यांचेही पूजन केले जाते त्या घरांमध्ये देवी लक्ष्मी स्थायी रुपामध्ये वास्तव्य करते. कारण जिथे श्रीहरी विष्णू तिथेच देवी लक्ष्मी.
जर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल आणि श्रीहरी विष्णुंची मूर्ती नसेल तर देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा व कुबेर देवांचा फोटो किंवा मूर्ती जरूर असावी. गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवताआहेत. आणि कुबेर महाराज हे धनाची देवता आहेत. म्हणून देवी लक्ष्मीबरोबर गणपती बाप्पा व कुबेर महाराजांचे पूजन जरूर करावे.
म्हणजे आपल्या घरात धन सुख समृद्धी व ज्ञान येईल. आपल्या घरात श्रीराम दरबाराचा फोटो जरूर असावा. यामुळे आपल्या घरात शांतता आणि समृद्धी नांदते. घरातील सदस्यांमध्ये एकता होते. घरात वादविवाद, भांडण तंटे होत नाहीत. पती पत्नीचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम राहते. बाळकृष्णाची मूर्ती देवघरात असणे हे शुभ मानले जाते.
राधेकृष्ण एकत्र किंवा श्री कृष्णाची बासरी वाजवणारी उभी मूर्ती देखील आपण देवघरात ठेवू शकतो. ज्यांच्या देवघरात एकाक्ष नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते त्या घरात देवी लक्ष्मी सदैव निवास करते. तेथे अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. कुटुंबामध्ये एकता व आपलेपणा टिकून रहावा म्हणून श्री रामांचा राम दरबाराचा फोटो घरामध्ये लावावा.
सुर्यदेवांची तांब्याची प्रतिकृती घरामध्ये लावावी. गणपतीची मूर्ती आणताना त्यांची सोंड उजवीकडे असावी व सोंडेत लाडू असावा. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आणताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. की, त्यांच्या सोंडेत लाडू आणि पायात उंदीर जरूर असावा.
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उभी असलेली गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. त्यांचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत ही मूर्ती दुकानाच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजे ईशान्य दिशेस ठेवने खूप असते. ज्या घरात शंकराचे पूजन होते त्या घरात स्वतः लक्ष्मी निवास करते. ज्या घरात दक्षिणावर शंकाचे पूजन केले जाते त्या घरातील कर्ता पुरूष श्री कृष्णाप्रमाणेच सौभाग्यशाली व धनवान बनतो.
ज्या घरात विधिवत पूजा करून शंकाची स्थापना केली जाते तेथे भूत प्रेत पिशाच्च राक्षस यांची बाधा होत नाही. यांच्यापासून होणाऱ्या त्रासांचे आपोआप समाधान होते. देवी लक्ष्मी व कुबेर महाराज यांचे पूजन केल्यास पैशांच्या संबंधीचे सर्व अडचणी दूर होतात. म्हणून इतर देवी देवतांबरोबरच कुबेर महाराजांचे पूजन अवश्य करावे.
जर आपल्या कर्तव्याची व्यवस्थित पालन करून आपण कुबेर महाराजांचे पूजन केले व कुबेर यंत्राची देवघरात स्थापना केली तर निश्चितच प्र स न्न होतात व व्यापारात आणि धनात वृद्धी होऊन सुख व समाधान प्राप्त होते. त्याशिवाय जे आपले कुलदैवत असतील त्यांच्या मुर्त्यादेखील देवघरात आवश्यक असाव्यात.
कारण त्याशिवाय देवघर पूर्ण होत नाही. आता आपण जाणून घेऊया देवघरात कोणकोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या असू नयेत. भैरवनाथाची मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये. भैरवनाथ हे महादेवांचे 1 अवतार आहेत. परंतु त्यांचे घरात पूजन केल्यास घरात नको असलेल्या घटना घडू लागतात.
आपण मंदिरात जाऊन भैरवनाथांची पूजा करू शकतो. पण घरात कधीही भैरवनाथांची पूजा करू नये. दुसरी मूर्ती म्हणजे नटराजांची मूर्ती. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींच्या घरी नटराजाची मूर्ती असेलच. नटराजांची मूर्ती दिसायला खूप आकर्षक असते. त्याशिवाय ते महादेवांचे एक रूप आहे.
परंतु ते रुद्र रुपात म्हणजेच क्रोधात आहे आणि त्यांच्या या क्रोधाचा सामना सामान्य माणूस करू शकत नाही. म्हणून नटराजांची मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये. आपण घराबाहेर नतर्वजांची पुजन करू शकतो. असे नाही की त्यांचे पूजन करायचेच नाही. परंतु घरात या देवी देवतांना ठेवू नये. घरात राहू व केतुच पूजन करू नये.
कारण हे पाप ग्रह आहेत. आपण जर यांचे पुजन घरात केले तर स्वतः अशांततेला घरात आमंत्रण देण्यासारखे आहे. राहू व केतूचे पूजन केल्यास आपल्या कष्टाचे निवारण होते. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये यांचे पूजन काढण्यास मनाई आहे. घराबाहेर आपण यांचे पुजन करू शकतो. घरात राहू व केतू यांचे पूजन केले तर आपल्यामध्ये राक्षसी गुण येतात.
यामुळे आपल्या जीवनात नको त्या घटना घडू लागतात. आपले जीवन असता व्यस्त होते. आपल्या प्रत्येक कार्यात अडचणी येतात. म्हणून राहू व केतुची मूर्ती घरात कधीही ठेवू नये. तसेच जरआपण सिंहवर बसलेली देवी देवता घरात ठेवत असाल तर सिंह हा कधीही शांत असावा. तो चिडलेला किंवा क्रोधीत नसावा. त्याचे तोंड उघडलेले नसावे.
कारण अशा मूर्ती सिंहावर बसलेली देवी देवता हे शक्यतो क्रोधीत रुपात राक्षसाचा वध करीत असतात आणि अशा क्रोधीत देवी देवता त्यांचा सामना आपण कधीही करू शकत नाही. अशा क्रोधीत रूपामुळे आपल्या घरात नेहमी अशांतता निर्माण होते. म्हणून चिडलेल्या सिंहावर बसलेल्या मूर्ती घरात कधीही ठेऊ नयेत.
कारण देवघरातून सात्विक व शुद्ध लहरी घरात पसरतात. परंतु देवघरात चुकीच्या मुर्त्या असतील तर घरातील वातावरण बिघडते. पण अशा मुर्त्या घरात कधीही ठेवू नये. आता आपल्या लक्षात आले असेलच की, देवघरात कोणत्या मुर्त्या असाव्यात व कोणत्या मुर्त्या असू नये.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.