वास्तुशास्त्रानुसार करोडो रुपयाच्या आहेत या वस्तू
नमस्कार मित्रांनो,
कवडी देवी लक्ष्मीच्या पूजनात फार महत्त्व आहे कवड्या विविध रंगात येतात. जसे पांढऱ्या, पिवळ्या, भुरकट आणि ठिपक्याच्या यातील पांढरी कवडी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्रीहरी विष्णूंना पिवळी कवडी प्रिया आहे. कवड्या समुद्रात मिळतात. आज आपण कवड्यांच्या उपायांनी धन कसे मिळवायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मी पूजनाबरोबरच 11 सिद्ध कवड्यांचे पूजन करावे. आणि या कवड्याना पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावे. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेले राहते. आपल्या घरात सुख व समृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर 11 सिद्ध कवड्यांनी लाल कापडात बांधून ती गाठोडी लटकावून द्यावी.
असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते. त्याबरोबरच आपल्या घरात कोणतीही न का रा त्म क उर्जा प्रवेशही करत नाही. जर वाईट नजरेपासून आपला बचाव करायचा असेल तर एक पिवळ्या रंगाची कवडी काळ्या दोऱ्यात टाकून गळ्यात धारण करावी. असे केल्याने कोणतीही वाईट नजर आपल्याला स्पर्शही करू शकत नाही.
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी काही खास उपाय करून आपण देवी आईला प्रसन्न करू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी पिवळ्या कवडीच्या टोटका खूपच प्रभावी सिद्ध होऊ शकतो. तर शुक्रवारी या कवडीचा कोणता उपाय करावा ते आता आपण पाहूया. ज्योतिष शास्त्रानुसार कवडीने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शुक्रवारी पिवळ्या कापडात 11 सिद्ध पिवळ्या कवड्या थोडेसे केसर आणि चांदीचे एक नाणे ठेवून त्याचे गाठोडी तयार करावी.
आता ही गाठोडी देवी लक्ष्मीच्या चरणांना लावून आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी. यामुळे आपल्या धनात वृद्धी होते. शुक्रवारी गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करणे ही शुभ असते. यामध्ये आपण पांढरे वस्त्र, पीठ, तांदूळ, साखर किंवा इतर कोणतीही पांढरी वस्तू दान करू शकतो. ज्या व्यक्तींना आपली इच्छा मनोकामना पूर्ण करायचे असेल त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी 3 किंवा 5 कन्याना बोलावून त्यांना खीर खायला द्यावी.
यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. जर आपल्याला घरात सुख व समाधान मिळवायचे असेल तर देवी लक्ष्मी समोर 11 पांढऱ्या कवड्यात ठेवून तेथे शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्याबरोबरच दिव्यामध्ये एक दोन केसराच्या काड्या टाकाव्यात. यामुळे घरात धन धान्यात वृद्धी होते. देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्याने शुक्रवारी श्रीहरी विष्णूंचे पूजन केल्यानेही आपल्यावर देवी प्रसन्न होते.
शास्त्रानुसार श्रीहरी विष्णूंना दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्या पाण्याने जर स्नान घातले तर भगवंतांचे आपल्यावर कृपा होते. जर आपले कोणतेही काम होत नसेल, प्रत्येक कामात काही ना काही बाधा येत असतील तर शुक्रवारी 4 मुखी दिवा लावावा. त्यात लाल रंगाच्या वाती लावाव्यात व हा दिवा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसमोर लावावा. यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतात.
पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होण्यासाठी व सौभाग्य मिळवण्यासाठी शुक्रवारी सौभाग्याचे सामान दान करावे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जर आपल्याला नोकरी लागत नसेल तर शुक्रवारी सिद्ध 21 कवड्या नवीन पिवळ्या वस्त्रात ठेवून देवी लक्ष्मीच्या कोणत्याही सिद्ध मंत्राने 108 वेळा जप करून देवीला लाल रंगाचे गुलाबाचे फुल अर्पण करावे.
आता पूजनानंतर त्या फुलाला आपल्याजवळ ठेवावे आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्या खिशात पर्स किंवा पाकिटात घेऊन जावे. यामुळे आपले काम लवकरच होईल व नोकरी लागेल. शुक्रवारी कोणतेही तांब्याच्या ताटात 11 कवड्या व देवी लक्ष्मीचे प्रिय श्री यंत्र ठेऊन देवघरात ठेवावे. यानंतर यावर कुंकवाने स्वस्तिक बनवावे. त्यानंतर यथाशक्ती पूजन करून देवीकडे प्रार्थना करावी की, हे देवी आई तुझ्या सर्व भक्तांवर तुझी छत्रछाया असू दे.
यानंतर सिद्ध श्री यंत्र आपल्या पर्समध्ये ठेवावे आणि त्या कवड्यांना आपल्या तिजोरीत कोणत्याही लाल कापडात बांधून ठेवून द्यावे. असे केल्याने आपला खिसा नेहमी पैशांनी भरलेले राहील. शुक्रवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे. यामुळे घरात समृद्धी येते यामुळे घरातील नकारात्मकतेचाही लाभ होतो.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.