स्वयंपाकघरात बनलेल्या शेवटच्या भाकरीची शक्ती जाणून घ्या, ही भाकरी गरिबी घालवते.

स्वयंपाकघरात बनलेल्या शेवटच्या भाकरीची शक्ती जाणून घ्या, ही भाकरी गरिबी घालवते.

नमस्कार मित्रांनो,

आपण केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप मोठे मोठे फायदे करून देतात आणि आपली छोट्यातील छोटी चूकही आपल्याला बरबाद करू शकते. आपलं जीवन हे त्या छोट्याशा पोटापासून सुरू होतं आणि त्या पोटापर्यंत समाप्त होत. म्हणजे मनुष्याचे सर्व धावपळ कष्ट हे ते पोटासाठी चाललेले असतात.

पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करतो. घरातही ग्रहलक्ष्मी आनंदी प्रसन्न असेल तर तिच्या हातून होणार साधा पदार्थही अगदी चविष्ट लागतो. पण ती जर क्रोधीत असेल, रागात असेल तर तिने पंचपक्वान बनवले तरीही त्याला चव येत नाही आणि खाणाराही पूर्णतः त्याने संतुष्ट होत नाही.

म्हणूनच जेवण बनवणं आणि ते खाणं या तुमची मानसिकता स्थिर असणे फार गरजेचे आहे. म्हणूनच घरात शांतीपण टिकून राहावी प्रेमही वाढावं आणि माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न राहावे यासाठी जेवण बनवल्यानंतर काही विशेष नियम आहेत ते प्रत्येकाने पाळायलाच हवे.

तसेच रात्री जेवण बनवताना चपाती किंवा भाकरी आपण केलेल्या असतील तर शेवटची चपाती किंवा भाकरी ही कशी बनवावी आणि त्यावर काय टाकावे म्हणजे आपले भाग्य उजळेल हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत. जेवताना ताटात कधीच उष्ठ ठेवू नये. एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून तो तसाच ठेवू नये.

लहान मुलांनी पूर्ण खाल्ले नाही किंवा जेवताना त्यांनी खाली पदार्थ पडले या सर्व गोष्टींमुळे घरातील माता लक्ष्मी ही रुष्ट होते. शेवटी अस हे अन्न डजबिनमध्ये टाकून देतो आणि हा सर्वात मोठा महालक्ष्मीचा अपमान आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढच ताटात घ्या. अन्नाचा अपमान हे महापाप आहे. याने देवी लक्ष्मी ही कायमची आपल्यावर रुष्ट होऊ शकते.

याने घरात देखील दरिद्रता सुद्धा येऊ शकते. त्याचबरोबर जेवणाच्या अगोदर आपण देवतांना नमस्कार करणं त्यांना धन्यवाद करण विसरू नका. जेवणाचा पहिला घास हा त्या देवी देवतांच्या नावाने बाजूला काढून ठेवा. त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात करा. जेवणानंतर तो ठेवलेला जो घास आहे तो पशुपक्ष्यांना खायला द्या.

हे झाले जेवणाच्या बाबतीत काही नियम. जे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाळायला हवेत. जेवणानंतर बऱ्याच जणांना ताटामध्ये हात धुण्याची सवय असते. तुम्हाला जर ही सवय असेल तर ती आजच बंद करा. कारण ताटात हात धुतल्याने आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष निर्माण होतो.

त्यामुळे जेवणानंतर ताट दोन्ही हाताने उचलून बेसिनमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा. या सर्व जुन्या काळातील गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला पूर्णपणे विसर पडलेला आहे आणि म्हणूनच आज आपल्या घरात सतत वादविवाद, क्लेश, राग यांनी जागा घेतलेली आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला विसरून चालणार नाही.

आता आपण पाहुयात चपाती किंवा भाकरी करताना आपण जी शेवटची चपाती बनवतो ती कशाप्रकारे बनवावी ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास सतत राहील. पूर्वीच्या काळापासून पहिली भाकरी गाईला आणि शेवटची कुत्र्याला केली जायची आणि प्रेमभावनेने ती त्यांना खाऊही घालायची. त्यामुळे पहिले लोक हे सतत संतुष्ट राहायचे.

कोणताही राहू केतू शनी त्यांना कधीही त्रास देत नसे. पण आता गायही नाही आणि कुत्राही मिळत नाही. मग अशा वेळी काय करायचे? सकाळी स्वयंपाक बनवताना आपण जी पहिली चपाती बनवतो ती आपण गाईला खाऊ घालायला हवी. पण आपल्याकडे जर गाय उपलब्ध नसेल तर अशी चपाती आपण होम स्वरूपात त्या देवतांना नैवेद्य देऊ शकतो.

म्हणजे एखाद्या लोखंडाच्या चाळणीमध्ये अशा चपातीच हवन स्वरूपात आपण नैवेद्य म्हणून देवतांना रोज दाखवू शकतो. त्यासाठी त्या चपातीचे तुकडे करून त्यात तूप साखर टाकून थोडसं त्यावर पाणी शिंपडावे आणि एखाद्या लोखंडाच्या चाळणीला गॅसवर मांडा आणि ही चपाती अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून या चपातीचे तुकडे तुम्ही त्या चाळणीमध्ये टाका.

याने देवाला रोजचे रोज प्रसादही चढवला जाईल आणि हवन देखील होईल. आता शेवटच्या चपातीच काय करायचं ते पाहुयात. शेवटच्या चपातीवरही थोडीशी साखर टाका आणि त्यावर दूध शिंपडायला विसरू नका आणि अशी ही चपाती तुम्हाला शक्य असेल तर नक्की एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला.

आणि तुम्हाला वाटलं की, रात्री कुत्रा मिळणे अशक्य आहे तर ही चपाती तसेच दुमडून व्यवस्थित डब्यात ठेवा जेणेकरून ती चपाती कडक होणार नाही आणि सकाळी मग ही चपाती एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला आणि जर कुत्रा मिळणं अशक्य असेल तर मग त्या चपातीचे बारीक तुकडे करून एखाद्या ताटात ठेवा आणि हे ताट बाल्कनी किंवा गच्चीवर ठेवा.

मग त्याला एखाद्या पक्ष्याने खाल्ले किंवा मुंग्यांनी खाल्लं तरीही चालेल. फक्त ते कोणाच्या ना कोणाच्या पोटात जायला हवं. शेवटच्या चपातील तुम्ही जर अशाप्रकारे कुत्र्याला किंवा पशुपक्ष्यांना, मुंग्यांना खाऊ घातलं तर पहा तुम्हाला अनंत धनाची प्राप्ती होईल.

कधीही घरात पैशांची कमतरता जाणवणार नाही. जर तुम्ही या सर्व गोष्टी पूर्वीपासून करत असाल तर खूप छान गोष्ट आहे किंवा चांगली गोष्ट आहे. पण जो करत नाही त्याने अवश्य या गोष्टीचा अवलंब करा. पहा मग तुमचं भाग्य हे नक्कीच उजळेल धन्यवाद.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *