प्राचीन ग्रंथानुसार दुसऱ्यांचे कपडे घालने योग्य की अयोग्य ! नक्कीच जाणून घ्या.

प्राचीन ग्रंथानुसार दुसऱ्यांचे कपडे घालने योग्य की अयोग्य ! नक्कीच जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो,

एखाद्या फंक्शन, पार्टी किंवा कार्यक्रमात आपल्याला जायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला असा प्रश्न पडतो की, आता कपडे कोणते घालायचे? मग प्रत्येक ड्रेस साडी सूट आपल्याला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात वापरलेला दिसू लागतो. परंतु आपल्याला काहीतरी नवीन हवे असते.

तोच तोचपणा नको असतो. म्हणून आपण काय करतो की, मित्र-मैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक असले की त्यांचे कपडे घालून कार्यक्रमाला जातो. यामुळे आपण तोच तोचपणा टाळतो व काहीतरी वेगळे दुसण्याचा प्रयत्न करतो. परंतु इतरांचे कपडे घालणे हे योग्य आहे का?

शास्त्रानुसार इतरांचे कपडे कधीही घालू नये. कारण आपण जर इतरांचे कपडे घातले तर त्यांच्यातील गुण, अवगुण नकारात्मकता आपल्यामध्ये उतरते. त्याशिवाय त्या व्यक्तीला जर एखादा आजार असेल त्वचारोग असेल जो आपल्याला माहीत नसेल तर तो आजार, तो त्वचारोगही आपल्याला जडण्याची शक्यता असते.

आपण जसे आहोत त्याप्रमाणे आजूबाजूच्या वस्तूंवर प्रभाव पडत असतो. आपण जर स का रा त्म क शक्तीने परिपूर्ण असलो तर आपल्या आसपासही स का रा त्म क ऊर्जा व्यक्त असते आणि जर आपण नकारात्मकतेने भरलेले असलो तर आपल्या आसपास व आसपासच्या सर्व वस्तूंवर न का रा त्म क प्रभाव जाणवतो.

त्याप्रमाणे कपड्यांमध्ये ही स का रा त्म क व न का रा त्म क ऊर्जा भरलेली असते. आपण जर एखाद्या भांडखोर, हट्टी, तापट व्यक्तीचे कपडे परिधान केले तर त्याचे तेच गुण आपल्यामध्ये उतरतात. तसेच जर त्या व्यक्तीमध्ये काही दुर्गुण असतील, काही वाईट ऊर्जा असेल तर त्याचाही प्रभाव आपल्यावर पडतो.

आपण अनेक वेळा अनुभव घेतला असेल की, भांडखोर व्यक्तीचे कपडे जर आपण परिधान केले तर आपणही चिडचिड व रागराग करू लागतो. जास्त बडबड्या व्यक्तीचे जर कपडे आपण घातले तर आपणही बडबड करू लागतो. त्याप्रमाणे जर आपण चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीचे कपडे घातले तर त्या व्यक्तीच्या चांगल्या स्वभावाचाही प्रभाव आपल्यावर पडतो.

म्हणून जर इतरांचे कपडे घालायचेच असतील तर ते स्वच्छ धुऊन मगच घालावे. ते ही ज्यांना कोणताही आजार नाही, ज्यांचे मन साफ आहे, ज्यांचा स्वभाव चांगला आहे अशाच व्यक्तींचे कपडे घालावे. परंतु शक्यतो इतरांचे कपडे घालणे टाळावे. आपले जुने कपडेही इतरांना देताना ते व्यवस्थित धुऊन मगच इतरांना द्यावे.

कारण आपल्या कपड्यांमध्येही आपली ऊर्जा असते आणि जर आपण अंगावरील कपडे न धुता तसेच इतरांना दिले तर ते त्यावर काही प्रयोग करून आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणून आपले कपडेही इतरांना वापरायला देऊ नये आणि इतरांचे कपडेही आपण वापरू नये.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *