कशा असतात मेष राशीच्या महिला?
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपले स्वागत आहे वायरल मराठी या पेजवर, बर्याचदा असं होतं की, कधी कधी एखादी व्यक्ती असं का वागते आपल्याला कळतच नाही? कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला आडमुठी वाटते तर कधी कधी एखादी व्यक्ती आक्रमक वाटते.
पण कितीही समजावलं तरी त्या व्यक्तीच्या स्वभावात फरक पडत नाही आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे हा तर तिच्या राशीचा गुण आहे. बरोबर मित्रांनो तुमची रास ही तुमच्या स्वभावावर परिणाम करत असते आणि म्हणून आज आपण मेष राशीच्या स्त्रिया कशा असतात ते जाणून घेणार घेऊयात.
मेष राशीच्या महिला या सुदृढ प्रकृतीच्या, गौरवर्णी, मोठे टपोरे डोळे आणि बांधेसूद, काटक असतात. चपळ हालचाली आणि विसपारी डोळे त्यामुळे या स्त्रिया समोरच्या व्यक्तीवर छाप पाडतात. मेष राशीच्या स्त्रिया पोषाखाच्या बाबतीत चोखंदर आणि शिस्तीच्या पाहायला मिळतात.
टापटिपीत पोषाख केलेल्या मेष राशीच्या स्त्रियांना आधुनिक पद्धतीतील पर्स, चपला, घड्याळ यांचे सुद्धा खूप आवड असते. त्याबरोबर त्यांना पारंपरिक डिझाईनपेक्षा आधुनिक डिझाईनची जास्त आवडते. खरेदी करत असताना मेष राशीच्या स्त्रिया वाजवी किंमतीत दर्जेदार वस्तू खरेदी करतात.
वस्तूचा दर्जा पारखल्याशिवाय त्यांची खरेदी त्या कधीच करत नाहीत किंवा वस्तू दर्जेदार नसेल आणि घरी आल्यावर लक्षात आल्यानंतर परत दुकानदाराकडे जाऊन त्याला दोन खडेबोल ऐकून ती वस्तू परत देऊन दुसरी वस्तू घेऊनच या त्या गप्प बसतात.
समूह प्रिय असलेल्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांच्या घोळक्यात या स्त्रिया सहजतेने वावरताना आणि हसताना आपल्याला दिसतात. मेष राशीच्या स्त्रिया फक्त मित्र-मैत्रिणींमध्ये नव्हे तर अपरिचित अशा समूहामध्ये पटकन मिसळून जातात. मेष राशीच्या स्त्रियांना मैदानी खेळांची खूप आवड असते.
त्याचबरोबर या खूप कलात्मक सुद्धा असतात. साधारणपणे चांगला चित्रपट, नाटक, आर्ट गॅलरीतून फेरफटका मारायला यांना खूप आवडते. सामाजिक मदत म्हणून काम करण्यासाठी नेहमी पुढे असतात. मेष राशीच्या स्त्रिया आपला परिसर झाडून पुसून स्वच्छ ठेवतात.
अस्वच्छता, गदारोळ, अस्ताव्यस्तपणा, पसारा करणं या गोष्टींचा मेष राशीच्या स्त्रियांना टिटकार असतो. त्यामुळे स्वयंपाक घरात वेगवेगळे पदार्थ करत अगदी रमलेल्या अशा दिसतात. पण स्वच्छता मात्र मनापासून करतात. एखाद्या एकत्र कुटुंबात मेष राशीची जर एक जरी स्त्री असेल तरीसुद्धा ती कुणावरही अन्याय होऊ देत नाही.
अन्यायाविरूद्ध उठून बंड केल्याशिवाय मेष राशीची स्त्री राहणार नाही. पण मेष राशीच्या स्त्रियांना कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळाली नाही तर मात्र त्यांची कुचंबणा होऊन त्या चिडचिड्या बनतात. मेष राशीच्या स्त्रिया अत्यंत रागीट आणि हट्टी स्वभावाचे असतात.
त्यामुळे कुठल्या ना कुठल्यातरी उद्योगात, छंदात मेष राशीच्या स्त्रियांनी मन रमवायला शिकलं पाहिजे. कर्तुत्व गाजवाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मेष राशीच्या स्त्रिया या अफाट कर्तुत्व गाजवतात. फक्त त्यांना साथ देणारा जीवनसाथी मिळायला हवा. मग या स्त्रिया नक्कीच पूर्ण कुटुंबाचा नावलौकिक केल्याशिवाय राहत नाही.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.