जुने कपडे काय करावे? जुने कपडे या दिवशी दान करा, सगळे दारिद्र्य दूर होईल.
नमस्कार मित्रांनो,
आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवडते. विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप दिसून येते. नेहमी नवीन कपडे खरेदी करणे, शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात. कुठेही सेल लागला, नवीन एखादी फॅशन आली कपडेविषयीची तर तो कपडा आपल्या कपाटात असायलाच पाहिजे अशा स्त्रियांचा आग्रह असतो.
असे करून आपण भरपूर कपडे खरेदी करतो आणि आपल्या कपाटात कपड्यांचा ढीग तयार होतो. इतके कपडे जमा झाल्यावर त्याचा वापर मात्र होत नाही. नवनवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे घातले जातात आणि परत आपल्या कपाटात ते पडून राहतात. असं करून कपाट अगदी गच्च भरतो आणि मग असे वाटते की, जुने कपडे बाहेर काढावी.
मग आपण लहान होणारे, न येणारे फिटिंग असणारी, फाटके कपडे बाजूला काढतो. मग एवढे कपडे आणि कपड्यांचा ढीग पाहिल्यावर आपल्याला वाटते की, हे जुने कपडे करावे तरी काय? मग मित्रांनो आपण हेच पाहणार आहोत की जुनी कपडे कुठे टाकावे? यामध्ये आपल्यावर काही परिणाम तर होणार नाही ना. आपल्या परिवाराला कुठला दोष तर लागणार नाही ना शास्त्रामध्ये काही उपाय आहे का याबद्दल.
जुनी कपडे कोणाला देऊ शकतो का? फाटके वस्त्र घातल्याने काही दोष तर लागणार नाही ना, मग जुने कपडे कोणत्या दिवशी बाहेर काढावी आणि जुने कपडे कुठे ठेवावे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या माहितीमध्ये आपण सगळेजण पाहणार आहोत. मित्रांनो शास्त्रामध्ये असे वर्णन आहे की, फाटके कपडे कधीही वापरू नये. कधी असे होते एवढे कपडे असल्यावर पण आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो.
आणि तो कितीही जुना झाला तरी आपण तो ड्रेस वापरत असतो. टाकून देऊ वाटत नाही मग आपला आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायम स्वरूपी ठेवतो. पण फाटके वस्त्र वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो आपल्या आजारांमध्ये वाढ होत असते. आपल्याला दुःख आणि त्रासाला सामोरे जावे लागते ही माहिती कदाचित तुम्हाला माहिती नसेल.
आणि याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागते. म्हणून कितीही आवडीचा ड्रेस असला तर तो टाकून द्यावा जुना झाल्यानंतर पाडल्यानंतर नक्की तो टाकून द्यावा. काही लोकांचे कमरेवरचे कपडे अगदी छान असतात. पण कमरेखालचे वस्त्र म्हणजे पॅन्ट वगैरे हे फाटके असतात. आणि ही प्रथा तरुण वर्गामध्ये नक्की पाहायला मिळते पण हे योग्य नाही आहे. फटके वस्त्र ते ही वापरू नये.
अगदी बनियन जरी फटके असेल तरी ती वापरु नये किंवा शिलाई उसवली असेल ती सुद्धा वापरू नये. नाहीतर किमान शिलाई करून तरी ते वस्त्र वापरावे. कारण कपड्याचा संबंध आपल्या हृदयाशी असतो. जर फाटके वस्त्र आपण परिधान केले वापरले तर त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते. फाटके वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा क्षय होत असतो. ऊर्जाही कमी होत असते त्याच पद्धतीने आपल्यावर शनीचा सुद्धा प्रकोप होऊ शकतो. म्हणून फाटके वस्त्र कधीही वापरू नये.
आता मग तुम्हाला असे वाटेल की या जुन्या आणि फाटक्यात कपड्यांचे करावे तरी काय? तर मित्रांनो फाटके कपडे फेकून द्यावी आणि जुने कपडे आहेत ते अजून फाटलेले नाहीत. पण चांगले आहेत फक्त त्याचा कलर कमी झालेला आहे, असे जुनाट दिसतात तर अशी जुनी आणि चांगले कपडे गोरगरिबाला दान द्यावी. याने आपला ग्रह दोष दूर होतो आणि आपल्याला आयुआरोग्य मिळते.
त्याच पद्धतीने गरिबांना देताना ती स्वच्छ धुऊन घ्यावेत. न धुता कपडे कोणालाही देऊ नये यांनी जर न धुता आपण एखाद्या गरिबाला ते वस्त्र दान दिले तर दरिद्रता येण्याची शक्यता असते. वस्त्र चांगले स्वच्छ धुऊन घ्यावी. आपल्याला देखील आयुआरोग्य मिळेल आणि समोरच्या गोरगरीब माणसाला सुद्धा आनंद मिळेल. मित्रांनो आता प्रश्न असा आहे की जुने कपडे घराच्या बाहेर कधी काढावी? शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे का?
तर शास्त्रांमध्ये अशी मान्यता अशी आहे जुने झालेले कपडे हे शनिवारी शक्यतो घराच्या बाहेर काढावे. याने आपल्याला सुख शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला आनंदही वाटेल. त्याला सुद्धा आयुआरोग्य मिळेल. त्याला देखील सुख शांती मिळेल आणि घरातील आपल्या घरातील न का रा त्म क ऊर्जा दूर होते. काही कपडे घरातील स्वच्छ तिला सुद्धा आपण वापरू शकतो. तरीही झाली या जुन्या कपड्यांची माहिती मित्रांनो मी आशा करतो ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.