जन्म घेतल्या घेतल्या मुले का रडतात?
नमस्कार मित्रांनो,
आपण नेहमी बघतो की, एखादी स्त्री प्रसूत झाली की, तिचे नवजात बालक लगेच रडायला लागते. काही बालके तर इतके जोरजोरात रडतात की, संपूर्ण दावाखाना जणू डोक्यावर घेतात. परंतु बाळ जन्माला येताच नेमके काय कारण असते की ते लगेच रडू लागते. असे काय होते की, बाळाला रडू येते.
आपल्या धर्मग्रंथांमध्ये या विषयी माहिती दिलेली आहे. सर्वात आधी कोणते बालक रडले होते ते आता आपण पाहूयात. बाळ जन्माला आले की ते क्या क्या करून रडू लागते. जसे काही ते विचारते काय काय मी येथे कोठे आहे. कारण आईच्या गर्भातून बाहेरच्या जगात येताच बालकाला वाटते की, मी इथे कोठे आलो.
तो जणू भगवंतांना म्हणतो की, भगवंता मला पुन्हा एकदा या सं घ र्ष म य जीवनात का पाठवले. परंतु ज्यांचा जन्म होतो त्यांचा मृत्यू होणे निश्चित आहे आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना नवीन शरीर धारण करून पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. हे सृष्टीचे चक्र आहे ते अविरत चालत असते. ब्र ह्म दे व ज्या वेळी या सृष्टीची रचना करीत होते त्यावेळी एक प्रसंग घडला होता.
त्या प्रसंगाचा उल्लेख विष्णू पुराणात केलेला आहे. ज्यामध्ये बाळ जन्माला येताच का रडते या विषयी माहिती दिलेली आहे. ज्यावेळी ब्र ह्म दे व आपल्याप्रमाणेच एका पुत्राची उत्पत्ती करण्याचा विचार करीत होते त्यावेळी त्यांच्या मांडीवर एक निळा रंगाचा वर्ण असलेले बालक प्रगट झाले.
ते बालक ब्रह्मदेवांच्या मांडीवरून उठून इकडे तिकडे पळू लागले आणि जोरजोरात रडू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला विचारले की, तू का रडत आहेस? तर त्या बालकाने ब्रह्मदेवांना सांगितले मी कोण आहे, मी कोठे आहे, माझे नाव काय? त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की, तुझा जन्म होताच तो रडायला लागला म्हणून आजपासून तुझे नाव रुद्र असेल.
ब्रह्मदेवांनी त्याला नाव सांगितल्यानंतर ते बालक पुन्हा 7 वेळा रडले म्हणून ब्रह्मदेवांनी त्याला आणखी 7 नावे दिली. ते म्हणजे भव, शर्व, ईशान, पशुपती, भीम, उग्र आणि महादेव अशाप्रकारे त्या बालकाला एकूण 8 नावे मिळाली. असे म्हटले जाते की, तेव्हापासूनच मुले जन्माला आली की लगेच रडायला सुरुवात करतात.
कारण त्यापूर्वी बालक जन्माला आले की रडत नसे. आरोग्य शास्त्रीय दृष्ट्या जर आपण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येते की, नवजात बालक हे आधी आईच्या गर्भात असते. तेथे बं दि स्त व सुरक्षित असते. जसे ते बाहेर येते तसे त्याला बाहेरच्या वातावरणात मिक्स व्हायला वेळ लागतो. बाहेरचे तापमान थंडी त्याला सहन होत नाही.
त्याशिवाय आईच्या गर्भात त्याला श्वासोश्वास नाकावाटे घ्यावा लागत नाही. आईच्या नाळेद्वारे त्याचा श्वासोश्वास चालू असतो. परंतु बाळाचा जन्म होताच ती नाळ कापली जाते आणि त्याला स्वतःहून श्वासोश्वास करावा लागतो आणि ज्यावेळी ते नवजात बालक श्वासोश्वास घेते त्यावेळी त्याच्या नाकातोंडात जमलेला जो द्रवपदार्थ असतो तो बाहेर पडतो.
त्याच्या संपूर्ण शरीरात द्रवपदार्थ भरलेला असतो. म्हणून तो द्रव पदार्थ बाहेर पडण्यासाठी बाळाचा जन्म होताच डॉक्टर त्याला उलटा धरतात आणि त्याच्या शरीरातील सर्व द्रव पदार्थ बाहेर काढतात. कारण तो द्रव पदार्थ बाहेर पडला नाही तर त्या बालकाला श्वासोश्वास करणे शक्य होणार नाही. म्हणूनच जन्मताच बालकाने दीर्घ श्वास घेणे आवश्यक असते.
हे तेव्हाच शक्य होते ज्यावेळी बालक जोरजोरात रडू लागेल आणि द्रव पदार्थ बाहेर पडून हवा आत जाण्यास येण्यास प्रतिबंध होणार नाही यासाठी रडण्याची क्रिया खूप आवश्यक असते. कारण रडताना बालक दीर्घ श्वास घेते.
म्हणूनच जर एखाद्या वेळी एखादे बालक जन्मत:च रडले नाही तर डॉक्टर त्याच्या पायावर चिमटी घेतात आणि बाळाला रडवतात. कारण जर बालक जन्मताच रडले नाही तर तो द्रव पदार्थ त्यांच्या फुफ्फुसात तसाच राहून त्याला ऑक्सीजन मिळणार नाही आणि हे त्याच्या मृत्यूचे कारणही बनू शकते.
जन्मताच बालक रडू लागले तर त्याचे संपूर्ण शरीराला तसेच मेंदूलाही ऑक्सिजनचा योग्यप्रकारे पुरवठा होतो आणि बालकाचा विकास व्यवस्थित होतो. जर बाळ जन्मल्या जन्मल्या लगेच रडले नाही तर त्याच्या मेंदूचा विकासही योग्यप्रकारे होत नाही आणि बालक मानसिकरित्या अपंग बनू शकते. तसेच बालकाला भूक लागली असेल, काही हवे असेल तर तो रडूनच आपल्या मागण्या पूर्ण करू शकतो.
बालक रडले तरच आई त्याला काय हवे नको ते पाहू शकते.
नाही तर बालक नुसता शांत राहिले तर आईला कसे कळेल की, बाळाला भूक लागली आहे किंवा बाळाने शी-शू केली आहे. त्याचे रडणे हे संवाद साधण्याचे माध्यम आहे. मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की, बाळ जन्माला येताच का रडू लागते ते.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.