आयुष्यात या 3 लोकांचे चुकूनही चांगले करू नका.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही नेहमी दुसर्यांचा चांगला व्हावा असाच विचार करता. अनेकदा आपण कर भला तो हो भला म्हणजेच दुसऱ्याचं जर आपण चांगलं केलं तर देव सुद्धा आपला चांगला करतो अशी आपली भावना असते. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की, हे जग आता बदललेला आहे.
हे जग पूर्वी इतकंच सरळ राहिलेलं नाही. जर तुम्ही अशाच प्रकारे साधेपणाने वागत राहिलात तर एक ना एक दिवस तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो खूप वर्षापूर्वी आचार्य चाणक्य यांनी सांगून ठेवलं की, समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की, ज्याचं चांगल चुकूनही करू नका.
अन्यथा आपल्यावरती संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो आपण आजच्या माहितीमध्ये पाहणार आहोत आचार्य चाणक्य त्यांच्या मते अशा कोणत्या व्यक्ती आहेत त्याचं चांगलं त्यांचं भलं आपण चुकूनही केलं नाही पाहिजे. मित्रांनो आचार्य चाणक्य यांच्या मते पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे दुष्ट स्वभावाची स्त्री. अशी स्त्री जिचा स्वभाव दृष्ट आहे, चारित्रहिन आहे अशा स्त्रीचे चांगल करण्याचं आपण विचारही करू नका.
कारण तुम्ही जर तसे केलेत तर समाजामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागते. समाजामध्ये तुमची हानी होते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मान-सन्मान राहत नाही. या स्त्रीया धर्माच्या विपरीत, धर्माच्या विरुद्ध काम करतात. आणि म्हणूनच त्यांच्या पापामध्ये तुम्ही सुद्धा त्या पापाचे भागीदारी बनता.
आचार्य चाणक्य दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगतात ती म्हणजे मूर्ख लोक. असे लोक फक्त स्वतःचेच ऐकतात. आणि ते दुसऱ्याचे अजिबात ऐकत नाहीत. अशा लोकांचं भलं होण्यासाठी त्यांना उपदेश करू नका, त्यांना कोणतीही चांगली गोष्ट सांगू नका. कारण तुम्ही त्या मुर्खांना समजण्याचा प्रयत्न केला तर हे मूर्ख लोक तुम्हाला खोटे ठरवतील.
आणि तुम्ही जे म्हणतं आहात तुमचं म्हणणं कशाप्रकारे खोट आहे हेच तुम्हाला सिद्ध करून दाखवतील. आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण तणावाला सामोरे जावे लागेल. तुमचं रक्तदाब वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या मनात असा विचार येईल की, मी ह्याला चांगलं सांगतोय. आणि हा मला उलट शिकवतोय. स्वतःची चूक कबूल करायला असे लोक अजिबात तयार नसतात.
त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही लांबच राहा. अशा लोकांचं भलं करण्याचा विचार करू नका. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे असे लोक जे सदैव दुःखी राहतात. कोणत्याही प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख काही कमी होत नाही. मित्रांनो खरं तर देवाने, परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे त्यामध्ये आपण सुखी रहावे. त्यामध्ये आपण समाधान मानायला हवं.
मात्र हे लोक कितीही पदरात पडलं तरीसुद्धा दुःखीच राहतात. आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात आला आणि तुम्ही त्यांना मदत करायला गेलात तर लक्षात घ्या त्यांच्या हा दुःखाचा रोग हा तुम्हाला सुद्धा लागतो. आणि तुम्ही सुद्धा दुःखी बनता म्हणून अशा तिसऱ्या प्रकारच्या लोकांपासून आपण लांब राहायला हवं. त्यांना चुकून सुद्धा मदत करू नये.
तर मित्रांनो अशा प्रकारे आचार्य चाणक्य यांनी आशा ह्या 3 लोकांबद्दल सांगीतलं आहे की, ज्यांच्यापासून आपण लांबच राहायला हवं. आपल्याला आपल्या आयुष्यात सुख हवा असेल टेन्शन मुक्त जीवन आपल्याला जगायचं असेल तर अशा व्यक्तीपासून लांबच राहायला हवं. म्हणजचे अशा लोकांच विचार करणं, अशा लोकांच भलं करणं आपण सोडून द्यायला पाहिजे.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.