आपल्याला जो नडला त्याला तिथेच फोडला या राशीचे लोक खूप रागीट असतात
नमस्कार मित्रांनो,
काही राशीच्या लोकांचा स्वभाव खूप रागीट असतो. ते लोक स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. या लोकांशी पंगा न घेणे चांगले. जाणून घेऊयात कोणकोणत्या आहेत राशी.
1) वृश्चिक राशी – वृश्चिक राशी ही मंगळाची राशी आहे. तसेच त्याचे प्रतिक विंचू आहे. त्याच्या आत खूप राग आहे. पण ते सहजपणे व्यक्त करत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जास्त त्रास देतो. तेव्हा त्यांना त्यांचा सामना करावा लागेल. तेव्हा ते लोक त्यांचा संयम गमावून बसतात.
2) मेष राशी – मेष ही मंगळाची राशी आहे. मंगळ हा ग्रह अतिशय क्रोधित स्वभावाचा असतो. मंगळाच्या स्वभावाचा या राशीवर खूप सारा प्रभाव पडत असतो. जर कोणाशी वादविवाद झाला तर ते मेष राशीचे लोक चिडतात आणि रागांमध्ये काहीही करू शकतात.
3) मकर राशी – मकर राशी ही शनिची राशी आहे. शनी देवाला कर्म फल देणारे म्हणतात. सहसा हे लोक आयुष्यातील कोणतेही काम विचारपूर्वक करतात. त्यांना कोणालाही दुखवायचे नसते. पण त्यांच्यासोबत कोणी फसवणूक केली तर ती गोष्ट ते कधीच विसरत नाहीत आणि त्यांना सोडतही नाहीत.
4) सिंह राशी – सिंह राशी ही सूर्याची रास आहे. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्याचा स्वभाव खूप गरम असतो. यामुळे सिंह राशीचे लोक तेजस्वी तर असतातच पण त्यासोबतच खूप रागीटही असतात.
सहसा ते सर्वांशी चांगले वागतात. पण ते एखाद्या वेळेस चिडले तर ते त्यांचा राग सांभाळू शकत नाहीत आणि त्यांचा राग आटोक्यात राहत नाही. हे लोक आपल्या पुढे कोणालाही चालु देत नाहीत.
5) कुंभ राशी – कुंभ राशी ही शनीची राशी आहे. या राशीचे लोक चुकीची गोष्ट पाहून चीडतात. ते कोणतेही वाईट गोष्ट करत नाहीत आणि वाईट गोष्ट सहनही करू शकत नाहीत आणि वाईट घडताना पाहतही नाहीत.
चुकीच्या गोष्टीला प्रतिकार करणे हे त्यांच्या स्वभावात आहे. ते त्यांच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी स्वतःच्या आत लपवून ठेवतात. म्हणून त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.