आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ह्या गोष्टी…

आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ह्या गोष्टी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपलं जीवनमान पण किती वेगवान झालय. आपल्या शाळेत असताना आपण मोठ्या कविता वाचून सहज लक्षात ठेवायचं. पण तंत्रज्ञान आल्यापासून आपण स्मरणशक्तीच्या बाबतीत थोडे कच्चे पडलोत. आपली जीवन पद्धती सुद्धा खूप धावपळीची झाली आहे.

दैनंदिन जीवनात आपण खूप लहान लहान गोष्टी विसरतो. कधी कधी आपल्याला आपल्या गाडीची चावी सापडत नाही. खूपदा आपण आपले हेल्मेट, डब्बा, रुमाल, मोबाईल विसरतो. याचा अर्थ आपला मेंदू कमकुवत नाहीये? कारण आपला मेंदू तब्बल 25 गीगा बाईट्स डेटा साठवू शकतो.

पण आपण त्यासाठी त्याची स्मरणशक्ती सुधारण आवश्यक आहे. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अमलात आणल्या तर आपल्या स्मरणशक्तीमध्ये अमुलाग्र बदल घडू शकतो. तर जाणून घेऊया स्मरणशक्ती वाढवण्याचे साध्या पद्धती.

मेंदूने साठवून ठेवलेली एखादी माहिती अथवा गोष्ट हवी तेव्हा हव्या त्या स्वरुपात आठवणे म्हणजे आपली स्मरणशक्ती. आपला मेंदू हा तीन टप्प्यात काम करतो. धी, धृती, स्मृती म्हणजेच ते ज्ञान अधिग्रहण करणे, नंतर ते संरक्षित करून ठेवणे आणि योग्य वेळी त्या ज्ञानाचे स्मरण होणे.

या तीनही टप्प्यावर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते अन्यथा स्मरणशक्तीशी निगडीत साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्ससारखे आजार होऊ शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते. सूर्य नमस्कार करणे, चालणे, धावणे या क्रियांनी मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.

प्राणायाम करणे ही काळाची गरज आहे. वाढते प्रदूषण, कामाचा ताण, एका जागी बसून काम यामुळे आपल्या आरोग्य आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रमारी ओंकार जप यांनी मनाची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करावा यामुळे स्मरणशक्ती सुद्धा सुधारते.

6 ते 8 तासाची झोप ही उत्तम स्मरणशक्तीसाठी आवश्यक असते. तसेच डोके व तळ पायाला रोज तेलाने मालिश केल्यास गाढ झोप लागते आणि स्मरणशक्ती तल्लख होते. उत्तम स्मरणशक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे. गाईचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या फळे यांचा रोजच्या रोज आहारात समावेश असावा.

आयुर्वेदानुसार गाईचे दूध, साळीच्या लाह्या, बदाम, अक्रोड तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ स्मरणशक्ती वाढवणारे आहेत मेमरी वाढवण्यासाठी काही साधे साधे खेळ आहेत ते खेळल्यास मेंदूचा व्यायामही होतो आणि आपली मेमरी फोरजी रेंजसारखी काम करते.

1) पिक्शनरी म्हणजे शब्दकोशाचा खेळ – हा शब्दाचा अंदाज लावणारा गेम आहे. जो तुमची स्मरणशक्ती सुधारतो. ज्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअल्स बघून क्लूज शोधावे लागतात आणि त्यावर उपाय शोधावा लागतो. हे आपली कल्पनाशक्ती आणि आपली समस्या सोडवण्याचे कौशल्ये सुधारते. म्हणून शब्दकोश कार्ड काढा आणि हा गेम खेळा.

2) क्रॉसवर्ड म्हणजे शब्द कोड्यांचा खेळ – शब्दकोडी दोन प्रकारे आपल्याला मदत करतात एक तर आपण मेंदूवर ताण दिल्याने स्मरणशक्तीला कार्यरत करतो आणि दुसरं म्हणजे आपला शब्दसंग्रह वाढतो.

3) रुबिक क्युब – हा खेळ थ्री इडियट्स चित्रपटात आमिर खान खेळतो यामुळे आपल्या बोटांचा आणि मेंदूचा ताळमेळ नसतो. यात रंगसंगती लावण्याची आणि त्याद्वारे गोष्टी स्मरणात ठेवण्याची क्षमता वाढते.

4) सुडोकू – हा खेळ आपल्या मेंदूवर सर्वात जास्त ताण देतो. हा खेळ खेळणे तुमच्या मेंदूचं कार्य अनेक पटीने वाढतं. आपली स्मरणशक्ती ही आपण आपल्या इच्छेनुसार केव्हाही सुधारू शकतो. वयाच्या 75 व्या वर्षीही अमिताभ बच्चन हे चित्रपटात काम करतात. म्हणजे त्यांची स्मरणशक्ती या वयात पण नक्की चांगली असेल.

चांगला आहार व्यायाम आणि काही वेळ आपल्या माणसामध्ये बोललं तरी मन हलके होते. मेंदूला जोर देण्यासाठी नवीन विचार आत्मसात करणे, पुस्तके वाचणे, बुद्धीपणाला लावणारे खेळ खेळून मेंदूला विचार करायला बाध्य केलं तरी आपली स्मरणशक्ती खूप चांगली होईल. आपली स्मरणशक्ती ही तरतरीत राहील. तेव्हा या पैकी एक तरी व्यायाम एकदा तरी आपल्या मेंदूला द्या आणि आपली स्मरणशक्ती अफाट वाढवा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *