फक्त दहा दिवसाचे चॅलेंज ! डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे 100 % या घरगुती उपायने गायब होणार म्हणजे होणार ..!
मित्रांनो, डोळ्यांच्या भोवती अनेकांना काळे डाग असतात त्यामुळे त्यांचा चेहरा कितीही सुंदर, गोरा असला तरी या या डागांमुळे खूपच वेगळा दिसायला लागतो. अनेक उपचार करून देखील ही काळी वर्तुळे कमी होत नाही. आज आपण एक घरगुती लिक्विड तयार करणार आहोत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग, शरीरावर कोणत्याही ठिकाणी काळी वर्तुळे किंवा डाग असतील आणि डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे निघून जातील. या उपाय साठी आपल्याला काय लागणार आहे हा उपाय कसा आणि केव्हा करायचा याची आपण माहिती घेणार आहोत.
आपले डोळे आ आणि चेहऱ्याची त्वचा तजेलदार असेल तर आपण चारचौघात उठून दिसतो परंतु ह्याच डोळ्यांभोवती जर सुरकुत्या आणि काळी वर्तुळे असतील तर त्या व्यक्तीचे वय जास्त वाटते तसेच ती व्यक्ती खूप थकलेली अथवा दमलेली आहे असे वाटते. आपण तरुण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते.
डोळ्यांखालील त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे त्या त्वचेवर सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त परिणाम होतो. डोळ्याभोवती काळी वर्तुळे आणि सुरकुत्या पडणे या समस्या जसजसे वय वाढेल तसतशी दिसून येते. परंतु अनुवंशिकता किंवा सध्याची धावपळीची लाईफस्टाईल यामुळे हल्ली ही समस्या तरुणांमध्ये सुद्धा दिसून येऊ लागली आहे.
मित्रांनो वाढते वय हे सुरकुत्यांचे प्रमुख कारण आहे हे तर निश्चित. परंतु तेवढे एकच कारण नाही. इतरही कारणांमुळे तरुण वयातच या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ती कारणे आपण आज जाणून घेऊया.
मित्रांनो या उपाय यासाठी आपल्याला काकडी, कोरफड जेल ,कच्च दूध, बदाम तेल, पुदिना या गोष्टी लागणार आहेत. सर्वात प्रथम काकडी आणि पुदिना मिक्सरमध्ये वाटून घ्या. हा रस दोन चमचे घ्या यामध्ये दोन चमचे थंड दूध घाला. एक चमचा बदाम तेल आणि सर्वात शेवटी दोन चमचे कोरफड जेल घाला या सर्व गोष्टी चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. जोपर्यंत हे जेल सारखा दिसत नाही तोपर्यंत मिश्रण ढवळत रहा.
हे तयार झालेले जेल एका पॅक बंद डब्यात भरून ठेवा रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळावर ही क्रीम लावून थोडावेळ हलक्या हाताने हळुवार मसाज करा. हा उपाय सलग काही दिवस करत राहा यामुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होतीलच. याशिवाय डोळ्याखाली सूज येत असेल, सुरकुत्या असतील तर त्याही निघून जाण्यास मदत होईल.
मित्रांनो, हे जेल काही दिवस डोळ्याखालील वर्तुळे साठी वापरल्यास तुम्हाला फरक जाणवेल. तसेच तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा सुरकुत्या असतील तर हे जेल लावून पहा. डोळ्याखालील काळी वर्तुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरमाची खड्डे, काळे डाग जाण्यासाठी हा घरगुती उपाय करून पहा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
मित्रांनो अलीकडे आपण खूप वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप ,कम्प्युटर या गोष्टींचा वापर करतो. यामुळे डोळ्यावर ताण येतो आणि यामुळे देखील डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात झोप व्यवस्थित नसेल काळजी असेल तरीही डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात. यासाठी मित्रांनो टेन्शन फ्री रहा आनंदी राहा आणि चेहरा धुताना नेहमी तोंडात पाणी भरून घ्या फुगे पर्यंत पाणी भरा आणि डोळ्यावरती गार पाण्याचे पंधरा वीस वेळा हबके मारा. यामुळे देखील डोळ्यांचा थकवा निघून जातो आणि डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे येण्याची समस्या दूर होते.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.