फक्त 1 चमचा मीठ असे वापरा घरातील मुंग्या, मच्छर, माशा छूमंतर होतील पुन्हा घरात दिसणार नाहीत.
नमस्कार मित्रांनो,
एक चमचाभर आपल्या सर्वांच्या घरामधल मीठ आणि एक लिंबू त्याचा या पद्धतीने वापर करा. घरांमधून कोणत्याही प्रकारच्या मुंग्या काळ्या, तांबड्या, लाल मुंग्या त्याचबरोबर घरामध्ये येणाऱ्या माशा आणि मच्छर छूमंतर होऊन जातील. त्यानंतर तुम्हाला ते घरामध्ये कधीही दिसणार नाही.
घरामध्ये मुंग्या झाल्यावर विशेषत: आपल्याला खूप त्रासदायक असतात. सर्व खाण्याच्या गोष्टीमध्ये या मुंग्या पसरतात. पाण्यामध्ये मुंग्या, साखरेत मुंग्या, कोणताही गोड पदार्थाला चटकन मुंग्या लागतात आणि या मुंग्या चावत्यात सुद्धा डोळ्याला किंवा कानाला जर या मुंग्या चावल्या तर सूज सुद्धा येते.
त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये घरामध्ये माशा आणि मच्छर खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. याचा खूप त्रास आपल्याला होतो. ही समस्या सर्व घरांमध्ये नित्याची जाणवते. तेव्हा घरामधील एक चमचाभर मीठ आणि एक लिंबू त्याचा या पद्धतीने वापर करा. घरांमधले मच्छर, मुंग्या आणि माशा पूर्णपणे छूमंतर होऊन जातील.
घरामध्ये एक चांगला सुगंध येईल. घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही घातक रसायन वापरण्याची गरज नाही, खडू वापरण्याची गरज नाही. जे फरशी पुसायला पाणी वापरता अशा पाच लिटर पाण्यासाठी आज आपण हा उपाय बघणार आहे.
आपल्याला उपाय असा करायचा की, एक चमचाभर मीठ घ्यायचा आहे. मीठ कोणताही असला तरी चालेल छोटं मीठ असेल किंवा मोठं असेल तरी चालेल. एक चमचाभर मीठ घ्यायचा आहे मोठा चमचा. एक लिंबू घ्यायचा आहे आणि खिसणीच्या सहाय्याने लिंबाची वरची साल काढायची आहे. आपल्याला फक्त लिंबाची साल घ्यायची आहे लिंबाचा रस नाही घ्यायचा आहे.
लिंबाची साल घेतल्यानंतर एक सुंदर असा सुगंध येतो. या लिंबाच्या सालीला आणि हेच घरामधील मच्छरसाठी, माशांसाठी आणि मुंग्यांसाठी बाहेर घालवण्याचे काम करतो. त्याचा एक छान असा वास येतो. आणि तिसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे चार ते पाच लवंगा. लंवगा सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतात.
फक्त या तीनच वस्तू आपल्याला याच्यासाठी लागतात. एक चमचाभर मीठ, एक लिंबाची साल आणि चार ते पाच लवंगा याला चांगल्यारीतीने एकत्र कुठून घ्यायचा आहे आणि जे पाणी आपण फरशी पुसण्यासाठी वापरतो साधारणत: पाच लिटर पाण्यामध्ये, हे सर्व मिक्स चांगल्यारीतीने कुठून घेतलेलं त्याच्या मध्ये टाकायचा आहे.
हे कुठून घेताना तुम्हाला एक सुंदर असा गंध म्हणजे वास येईल. तुम्हाला लगेच लक्षात येईल याचा खूपच सुंदर असा वास येतो. या वासामुळे घरांमध्ये मुंगी टिकत नाही. मुंगी, माशा आणि मच्छर तुमच्या घरामध्ये येत नाही. फरशी पुसण्यासाठी हे पाणी वापरायच आहे. घरामध्ये मुंग्या झाले असतील,
माश्या झाली असतील तर त्यासाठी विविध प्रकारच्या घातक रसायने वापरून मुंग्या मारून त्याचा फायदा होत नाही. कारण मुंग्यांची संख्या एवढी असते त्या मुंग्या जरी मारल्या तरी तेवढ्यातच प्रमाणामध्ये ते घरामध्ये परत येतात.
म्हणून हा साधा उपाय करा. तुमच्या घरामध्ये मुंग्या कोणत्याही प्रकारच्या असतील तर निघून जातील. माशा घरांमधल्या पूर्णपणे निघून जातील. या वासामुळे घरांमध्ये मच्छर सुद्धा टिकणार नाही.
महिन्यातून एक वेळ जरी या पाण्याने तुम्ही फरशी पुसली तरी घरामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची मुंगी दिसणार नाही त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये होणाऱ्या माश्या सुद्धा तुम्हाला अजिबात घरामध्ये दिसणार नाहीत. हा साधा आणि सोपा उपाय अवश्य करून पहा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.